Pune Crime | हरियाणा आणि दिल्लीतील तब्बल 22 गुन्ह्यात वाँटेड असणाऱ्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक, पोलिसांना ‘संमोहित’ करुन झाला होता फरार (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हरियाणा आणि दिल्लीमध्ये (Delhi) तब्बल 22 गुन्ह्यात वाँटेड (Wanted) असलेल्या तोतया कस्टम अधिकाऱ्याला (Customs Officer) पुणे पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहेत. तोतया अधिकारी पुण्यातील (Pune Crime) शिवाजीनगर परिसरात (Shivajinagar Area) वेशांतर करुन राहत होता. त्याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. जाफर अलिखान ईराणी Jafar Alikhan Irani (वय-30 रा. इराणी वस्ती, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

हरियाणा पोलिसांनी (Haryana Police) जाफर इराणीला 45 लाखाचे सोने चोरल्याप्रकरणी अटक केली होती. पोलिसांना संमोहित करुन तो पळून गेला होता. त्यामुळे 7 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आली होती. यामुळे हरियाणा पोलीस त्याच्या मागावर होते. शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील (Shivaji Nagar Police Station) पोलीस अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि.23) पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर रेल्वे स्टेशनजवळील (Shivajinagar Railway Station) विष्णूकृपानगर या इराणी वस्तीमध्ये एक जण त्यांना बघून पळून जाऊ लागला.

पोलिसांनी त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याला नुकतेच कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) अटक केली होती.
या गुन्ह्याता तो जामिनावर बाहेर आला असल्याची महिती समोर आली.
तसेच तो श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये (Shrigonda Police Station) दाखल गुन्ह्यात पाहिजे असलेबाबत माहिती पोलिसांना मिळाली. (Pune Crime)

 

त्याचाबाबत अधिक चौकशी केली असता हरियाणा आणि दिल्ली येथे तो मोस्ट वॉन्टेड (Most Wanted) असून एकूण 22 गुन्ह्यांमध्ये पाहिजे असल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली.
त्यापैकी हरियाणामधील हिसार पोलीस ठाण्यातील (Hisar Police Station) गुन्ह्यात त्याने कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करुन 45 लाखाचे 1 किलो सोने (Gold) चोरले होते.
हिसार पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्या देखरेखीवर असलेल्या पोलिसांना संमोहित (Hypnotized) करुन तो पळून गेला होता.
जाफर इराणी याला श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रियांका नारनवरे (DCP Priyanka Narnavare)
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली शिवजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More)
पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम गौड (Police Inspector Vikram Goud)
सहायक पोलीस निरीक्षक उत्तम माने (API Uttam Mane), पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (PSI Bhairavnath Shelke)
विनोद महागडे, विजय पानकर, हवालदार शबीर सय्याद, पोलीस अंमलदार राहुल होळकर, अनिकेत भिंगारे, अविनाश पुंडे,
ज्ञानेश माने, अमोल कोल्हे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Arrests Wanted Crimnal who Wanted In 22 Crimes In Haryana And Delhi Shivajinagar Police Station Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा