Pune Crime | प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन तरुणावर वार, सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | प्रेम प्रकरणाच्या संशयावरुन एका सराईत गुन्हेगाराने त्याच्या अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला अटक करुन अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना (Pune Crime) सोमवारी (दि.21) घडली होती.

 

ओम समाधान कसबे (वय-19 रा. तळजाई वसाहत, सध्या रा. चव्हाण नगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी 18 वर्षाच्या तरुणाने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. आरोपींविरुद्ध आयपीसी 307, 323, 504, 34, आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथक गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सुशांत फरांदे व महेश मंडलीक यांना आरोपी ओम कसबे आणि त्याचा अल्पवयीन साथीदार तिरुपतीनगर मधील गौतम खंडाळे यांच्या गोडावुन जवळ थांबल्याची माहिती मिळाली. पथकाने त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी ओम कसबे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर अशा प्रकराचे दोन गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रकाश पासलकर
यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे, हसन मुलाणी, पोलीस अंमलदार बापु खुटवड, भुजंग इंगळे,
सुशांत फरांदे, महेश मंडलिक, नवनाथ शिंदे, सागर सुतकर, सागर कुंभार, राजेंद्र नलावडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police arrests youth for stabbing youth on suspicion of love affair

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | लोणी काळभोर व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 20 जण ताब्यात

Maharashtra Karnataka Border Issue | कोल्हापूरमध्ये शिवसैनिकांनी काढली कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा

Sanjay Raut | संजय राऊतांना मोठा दिलासा ! उच्च न्यायालयाची जामिनाविरोधात सुनवाई करण्यास नकार