Pune Crime | पुणे कॅन्टोंमेंटचा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव याच्यावर ‘मोक्का’; रचला होता ‘बबलु गवळी’च्या खुनाचा कट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime |पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील बबलु गवळीच्या (Bablu Gavli) खुनाची सुपारी देणारा भाजपचा माजी नगरसेवक विवेक यादव (former bjp cantonment board corporator vivek yadav) व त्याच्या साथीदारांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांच्या आदेशावरुन  महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) कारवाई केली आहे.

विवेक यादव (Vivek Yadav, Pune) हा भाजपचा पुणे कॅन्टोंमेंटचा माजी नगरसेवक आहे. बबलु गवळी याने २०१६ च्या गणशोत्सव विसर्जन मिरवणुकीत विवेक यादव याच्यावर गोळीबार करुन गंभीर जखमी केले होते. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव याने शिक्षा भोगत असलेला व सध्या कोरोनामुळे पॅरोलवर कारागृहातून बाहेर आलेल्या राजन राजमणी याला सुपारी दिली होती. राजमणी व त्याचा साथीदार इब्राहिम शेख यांच्याकडे शस्त्रे असल्याची माहिती मिळाल्याने कोंढवा पोलीस (Kondhwa Police) ठाण्याचे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे (Police Sub Inspector Prabhakar Kapure) व त्यांच्या साथीदारांनी दोघांना पकडून त्यांच्याकडून 3 पिस्तुले व 7 काडतुसे, रोकड जप्त केली होती. राजन याच्याकडील मोबाईलमधील व्हॉटसअ‍ॅपच्या संभाषणावरुन विवेक यादव याने बबलु गवळी याच्या खुनाची सुपारी दिली होती. त्यासाठीच त्याने ही शस्त्रे पुरविली असल्याचे उघड झाले होते. राजमणी याला अटक केल्याचे समजल्यावर विवेक यादव हा फरार झाला होता. त्याला कोंढवा पोलिसांनी गुजरात -राजस्थान बॉर्डरवर अटक केली होती.

तपासादरम्यान विवेक यादव याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून संघटित गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. टोळीमधील सदस्यांना बदलून त्यांना बरोबर घेऊन बेकायदेशीरपणे गुन्हे करुन संघटीत गुन्हेगारी करीत असल्याचे आढळून आले. टोळी प्रमुख विवेक यादव  याने व त्याच्या संघटित टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवून टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी गुन्हे करीत असल्याचे तपासात समोर आले.

त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद
यांच्या सहकार्याने मोक्का प्रस्ताव तयार करुन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण (Addl. CP Namdev Chavan) यांच्याकडे सादर केला.
चव्हाण यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजुरी दिली. त्यानुसार या गुन्ह्यात मोक्का कलमाचा समावेश करण्यात आला आहे.
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande) अधिक तपास करीत आहेत.

Web Titel  : Pune Crime | Pune Police book former bjp cantonment board corporator vivek yadav under mcoca in knodhwa police station case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and
Twitter for every update

हे देखील वाचा

Tokyo Olympics 2020 | मीराबाईच्या ‘चांदी’च्या झळाळीचे रेल्वे मंत्र्यांनी केले कौतूक,
2 कोटी रुपयांसह प्रमोशन देण्याची घोषणा (Video)

Pune News | ‘डॉ. कलाम यंग रिसर्च फेलोशिप’चे डॉ.अरुण फिरोदिया यांच्या उपस्थितीत वितरण;
7 युवा संशोधकांचा गौरव ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी संशोधने व्हावीत : डॉ अरुण फिरोदिया