Pune Crime | प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या सराईतांना बंडगार्डन पोलिसांकडून अटक, 10 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बसमधील तसेच बस स्टॉपवर थांबलेल्या प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या (Mobile Thieves) दोन सराईत गुन्हेगारांना बंडगार्डन पोलिसांनी (Bundgarden Police Station) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आरोपींनी पुणे शहरातील (Pune Police) विविध ठिकाणी प्रवाशांचे मोबाईल चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदाम कासीम शेख (Saddam Qasim Shaikh), अनिल उर्फ आन्या अरुण बोबडे (Anil alias Anya Arun Bobade) असे अटक केलेल्या आरोपींची (Pune Criminals) नावे असून त्यांच्याकडून 10 लाखांचे 46 मोबाईल जप्त (Bundgarden Police Seized Mobiles of 10 Lacs) करण्यात आले आहेत. (Pune Crime)

याप्रकरणी ओंकार योगेश राठोड Omkar Yogesh Rathod (रा. कात्रज, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सदाम शेख (वय-23 रा. सोमजी गाव, कोंढवा-Kondhwa), अनिल उर्फ आन्या बोबडे (वय-27 रा. लाल देवळा जवळ, कँप, पुणे) यांना अटक केली. ही कारवाई 16 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या सुमारास पुणे स्टेशन (Pune Railway Station) येथील हॉटेल सम्राट गल्ली (Hotel Samrat Galli) येथे करण्यात आली. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार राठोड हे पुणे स्टेशन येथून कुटुंबासह ससून हॉस्पिटल (Sasoon Hospital) जवळील आंबेडकर पुतळा बस स्टॉप (Ambedkar Statue Bus Stop Pune) येथे पायी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींपैकी एकाने राठोड यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारुन घेतला तर दुसऱ्याने जोरात धक्का देऊन दोघेजण पळून गेले. याबाबत त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनानुसार आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज पानटपरी चालक, हातगाडीवाले व बातमीदार यांना देऊन आरोपी बाबत माहिती देण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी पुणे स्टेशन येथील हॉटेल सम्राट गल्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

 

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. तसेच पुणे स्टेशन परिसरातील बस स्टँड (Pune Station Bus Stand) आणि पुणे शहरातील विविध ठिकाणी बसमधील प्रवाशांचे 46 मोबाइल चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून 10 लाख रुपये किमतीचे 46 मोबाईल जप्त करुन 9 गुन्हे उघडकीस आणले.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Joint Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale), पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 सागर पाटील (DCP Sagar Patil), सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी (ACP Yashwant Gawari),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर (Senior Police Inspector Pratap Mankar),
पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते (Police Inspector Ashwini Satpute)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक राहुल पवार (PSI Rahul Pawar),
पोलीस अंमलदार मोहन काळे, फिरोज शेख, हरिष मोरे, प्रताप गायकवाड, नितीन जगताप,
सुधीर घोटकुले, अनिल कुसाळकर, अमोल सरडे, संजय वणवे, सागर घोरपडे, किरण तळेकर व अंकुश खानसोळे यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Bundgarden Police arrest twot
criminals for stealing passengers’ mobile phones, seize property worth Rs 10 lakh


Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Ramdas Athawale | ‘राज ठाकरेंनी मंदिरात भोंगे लावावेत पण मशिदीवरील भोंगे…’ – रामदास आठवले

Employees’ Provident Fund Organisation (EPFO Alert) ! सॅलरी लिमिट रू. 15,000 वरून वाढून रू. 21,000 करण्यावर सरकार करत आहे विचार; 75 लाख कर्मचार्‍यांना होणार फायदा

Rain in Maharashtra | राज्यात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज