Pune Crime | संतोष जगतापची ‘गेम’ करणार्‍या दोघांच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या; इंदापूर परिसरातून अग्नीशस्त्रे अन् वाहनासह अटक (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | राहू (Rahu) येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप Santosh Sampatrao Jagtap (38) याची लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीतील हॉटेल सोनाई समोर भरदिवसा गोळया घालून गेम करणार्‍या (Firing Case) दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलतना दिली (Pune Crime) आहे.

 

 

पंकज मिसाळ, नन्या आदलिंग अशी ताब्यात घेण्यात आलेल्याची नावे अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकानं (Pune Police Crime Branch)
अग्नीशस्त्रे आणि वाहनांसह ताब्यात घेतलं आहे.
गुन्हा घडल्यानंतर 30 तासाच्या आत पुणे पोलिसांनी संतोष जगतापच्या (Santosh Jagtap Firing Case) मारेकर्‍यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी हॉटेल सोनाई समोर राहु येथील वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप
(38) याच्यावर गोळीबार झाला होता. त्यामध्ये संतोष जगताप आणि त्याचा अंगरक्षक (Pune Crime) गंभीर जखमी झाले.
दरम्यान, संतोष जगतापचा मृत्यू झाला. संतोष जगतापने देखील फायरिंग केलं होतं.
त्यामध्ये स्वप्नील खैरे हा मयत झाला.

संतोष जगतापवर भरदिवसा गोळीबार करणार्‍याचा शोध पुणे पोलिस घेत होते. दरम्यान, आरोपींबाबत गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली.
प्राप्त माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर जवळून दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून अग्नीशस्त्रे आणि वाहन जप्त केल्याची माहिती
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीसनामा ऑनलाइनशी बोलतना दिली आहे. पंकज मिसाळ, नन्या आदलिंग यांना ताब्यात घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान, आरोपींची नावे आणि इतर माहिती सविस्तरपणे देण्यात येईल असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
इतर फरार आरोपींचा पुणे पोलिस शोध घेत (Pune Crime) आहेत.

 

Web Title : Pune Crime | Pune police caught the two in murder case Santosh sampatrao Jagtap; Arrested with firearms from Indapur area loni kalbhor police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | पत्नीच्या औषधोपचाराच्या खर्चाच्या तणावातून पतीनं आत्महत्या केल्यानं प्रचंड खळबळ

Social Media | सोशल मीडियावर शेयर केले पतीसोबत झालेले चॅट, न्यायालयाने पत्नीला सुनावली शिक्षा

Aurangabad Crime | लग्नानंतर 8 महिन्यातच महिला इलेक्ट्रिक इंजिनिअरची आत्महत्या, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

Mumbai Cruise Drugs Case | चौकशीला जाण्याआधी अभिनेत्री अनन्या पांडेंची मोठी ‘गेम’; NCB अधिकारीही गोंधळात