Pune Crime | पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची कात्रजमधील ‘चुहा गँग’वर मोक्का कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (pune police commissioner amitabh gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Acction) Mokka बडगा उचलला आहे. खंडणी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्नासह गंभीर गुन्हे करुन पुणे शहरातील (Pune Crime) कात्रज परिसरात दहशत (Crime) निर्माण करणाऱ्या चुहा गँगच्या म्होरक्यासह 5 जणांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

साकीब मेहबुब चौधरी उर्फ लतिफ बागवान (वय-22), चंद्रशेखर उर्फ शेखर ठोंबरे (वय-24), तन्वीर जमीर सय्यद (वय-27), ऋतिक चंद्रकांत काची (वय-19 चौघे रा. संतोषनगर, कात्रज) व अझरुद्दीन दिलावर शेख (वय-20 रा. अंजलीनगर, कात्रज) अशी मोक्का कारवाई केल्यांची नावे आहेत.

साकीब चौधरी व त्याच्या साथीदारांनी 3 जुलै रोजी रात्री साडे आठच्या सुमारास दत्ता नथू जाधव (वय-44 रा. नवीन वसाहत, कात्रज) हे पोलिसांना माहिती देतात,
या संशयावरुन आरीपींनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) गुन्हा (FIR)दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात पोलिसांनी साकीबसह त्याच्या साथिदारांना तात्काळ अटक केली होती.
आरोपी संघटीतपणे 2017 पासून गंभीर गुन्हे करीत होते.

आरोपींवर तडीपारीची कारवाई करुन देखील त्यांच्यामध्ये सुधारणा होत नव्हती.
त्यामुळे त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar) यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Additional Commissioner of Police Dr. Sanjay Shinde) यांच्याकडे पाठवला होता.
त्यानंतर संजय शिंदे यांनी आरोपींवर कारवाई करण्यास मंजूरी दिली.
पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (Assistant Commissioner of Police Sushma Chavan) करीत आहेत.

Web Title :- Pune Crime | pune police commissioner amitabh gupta take mocca action against 5 people including leader chuha gang who created terror katraj area

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Crime | नवर्‍याबरोबर ठेवतेस तसे माझ्याबरोबरही संबंध ठेव; सासर्‍याने केली सुनेकडे शरीरसुखाची मागणी

Beed Suicide | कोल्हापूर येथून बीड जिल्हयात आलेल्या प्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या; प्रचंड खळबळ

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा करणार होता ‘या’ अभिनेत्रींचे Live स्ट्रीमिंग; WhatsApp Chat मधून धक्कादायक खुलासे