Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध ! MPDA कायद्यान्वये पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची 55 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील (Pune Crime) सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा अभिलेखावरील गुन्हेगार (Criminal) आकाश विश्वनाथ काळरामे Akash Vishwanath Kalarame (वय-24 रा. चव्हाण चाळ, धायरी- Dhayari) याच्यावर एमपीडीए कायद्यानुसार (MPDA Act) एक वर्षासाठी स्थानबद्धतेची (Pune Crime) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 55 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

 

आकाश काळरामे याला एमपीडीए कायद्यान्वये नागपुर कारागृहात (Nagpur Jail) एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे. आरोपी हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोयता, लोखंडी रॉड यासारख्या हत्यारांसह दरोडा (Robbery), जबरी चोरी, दुखापत, विनापरवाना हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 05 गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime)

 

प्राप्त झालेला प्रस्ताव आणि कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आकाश काळरामे याच्यावर एमपीडीए अ‍ॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ शेख (Senior Police Inspector Yusuf Sheikh), पी.सी.बी. गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे (Senior Police Inspector Vaishali Chandgude) यांनी ही कामगिरी केली.

पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 55 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
यापुढेही सराईत व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर (Active Criminal) अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) कंबर कसली आहे.
त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का (MCOCA Action) Mokka, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta takes action against 55 persons under MPDA Act in last 15 months

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Diabetes | ‘मधुमेह’च्या रूग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे अश्वगंधा, जाणून घ्या कशी करते शुगर कंट्रोल

 

Crime News | धक्कादायक ! लष्कराच्या 3 जवानांकडून विवाहित महिलेवर सामुहिक बलात्कार; व्हिडिओ बनवून दिली धमकी

 

SBI Debit Card Pin And Green Pin | ‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी दिलासा ! आता ‘या’ सोप्या पद्धतीने घरबसल्या जनरेट करू शकता डेबिट कार्ड PIN व ग्रीन पिन