Pune Crime | पुण्यातील खडकी भागात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारासह त्याच्या टोळीवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 106 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | टोळीची दहशत आणि वचर्स्व प्रस्थापित करुन खडकी भागात दहशत माजविणाऱ्या सलमान नासीर शेख व त्याच्या टोळीच्या विरोधात पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA Action) Mokka कारवाई करण्याचे (Pune Crime) आदेश दिले. पोलीस आयुक्त यांनी आजपर्यंत 106 आणि चालु वर्षात 43 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

टोळी प्रमुख सलमान नासीर शेख (वय-28 रा. महादेव वाडी, खडकी), हितेश सतीश चांदणे (वय-22), प्रज्योत उर्फ मोना बाळकृष्ण उमाळे (वय-21), दिपक राजेंद्र ढोके (वय-21), शुभम बाळकृष्ण उमाळे (वय-19), आकाश उर्फ अक्कु संजय वाघमारे (वय-19), किरण अनिल खुडे (वय-19 सर्व रा. महादेव वाडी, खडकी) यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. (Pune Crime)

सलमान शेख आणि त्याच्या साथिदारांनी खडकी पोलीस ठाण्याच्या (Khadki Police Station) हद्दीमध्ये टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी दखलपात्र गुन्हे (Crime) केले आहेत. आरोपींनी खडकी परिसरात मालमत्तेचे नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी, गंभीर दुखापत, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, दरोडा घालणे, दहशत निर्माण करणे, शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. या टोळीमुळे परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.

खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane) यांनी परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar) यांच्यामार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan) यांच्याकडे सलमान शेख आणि त्याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार टोळी प्रमुख सलमान शेख आणि त्याच्या टोळीतील 6 असे एकूण 7 जणांवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (Hadapsar Division ACP Bajrang Desai) करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण,
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे
(Khadki Division ACP Aarti Bansode) यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक वैभव मगदूम (PSI Vaibhav Magadoom),
सर्व्हेलन्स पथकाचे पोलीस अंमलदार आर.के. जाधव, विकास धायतडक यांनी केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 106th action till date against criminals in pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Urfi Javed | प्रसिद्ध कॉमेडियनने केली उर्फी जावेद वर टीका; म्हणाला…

Shahid Afridi | शाहिद आफ्रिदीने दिला बाबर आझमला सल्ला, “या फलंदाजाला रिझवानसोबत ओपनिंग पाठवावे”

Rohit Sharma | सेमीफायनलच्या आधी रोहित शर्माने केला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड, जगातील एकाही कर्णधाराला आजवर जमला नाही