Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रविंद्र ढोले व त्याच्या साथिदारावर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 107 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा कायम ठेवत आतापर्यंत 107 टोळ्याविरुद्ध कारवाई केली आहे. पुण्यातील (Pune Crime) वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात (Warje Malwadi Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार रविंद्र वामन ढोले व त्याच्या टोळीतील एका साथिदारावर पुणे पोलीस (Pune Police) आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. आयुक्तांनी आजपर्यंत 107 आणि चालु वर्षात 44 टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.
टोळी प्रमुख रविंद्र वामन ढोले Ravindra Vaman Dhole (वय-30 रा. गल्ली.4, साई जीम समोर, कर्वेनगर, पुणे), त्याचा साथिदार प्रतीक प्रवीण दुसाने Pratik Pravin Dusane (वय-29 रा. सोनामाता अपार्टमेंट, सिंहगड रोड, पुणे) यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime)
रविंद्र ढोले व त्याच्या साथीदाराने वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), जबरी चोरी (Theft), खंडणी (Extortion), जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill), बेकायदा शस्त्र बाळगणे, नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांच्या आदेशाचा भंग करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. (Pune Crime)
रविंद्र ढोले टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके (Senior Police Inspector Dagdu Hake) यांनी अतिरिक्त कार्यभार परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास कोथरुड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे (ACP Rukmini Galande) करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale),
पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त रिक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके, पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे
(Police Inspector Dattaram Bagwe), पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल (PSI Manoj Bagal),
पोलीस अंमलदार सचिन कुदळे, अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांच्या पथकाने केली.
आयुक्तांची 107 वी मोक्का कारवाई
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या
व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 107 तर चालु वर्षात 44 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 107th action till date against Pune’s criminals, Ravindra Dhole and his accomplice booked under MCOCA
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update