Pune Crime | दहिहंडी उत्सवामध्ये गोळीबार करणाऱ्या चेतन ढेबे टोळीवर मोक्का, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 96 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दहशत पसरवण्यासाठी दहिहंडी उत्सवामध्ये (Dahihandi Festival) गोळीबार (Firing) करणाऱ्या गुंडासह 17 जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी (मोक्का MCOCA Action) Mokka नुसार कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी आजपर्यंत 96 आणि चालु वर्षात 33 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील (Sinhagad Road Police Station) रेकॉर्डवरील आरोपी आणि टोळी प्रमुख चेतन पांडुरंग ढेबे Chetan Pandurang Dhebe (वय-25 रा. हिंगणे-खुर्द) टोळी सदस्य बाळु धोंडीबा ढेबे (वय-24 रा. जनता वसाहत, पुणे), अनुराग राजु चांदणे (वय-20 रा. महादेव नगर, हिंगणे खुर्द), रमेश धाकलु कचरे (वय-19 रा. विजय डेअरी शेजारी, कात्रज), वैभव शिवाजी साबळे (वय-20 रा. हिंगणे खुर्द), रोहन दत्ता जाधव (वय-20 रा. हिंगणे खुर्द), रोहन दत्ता जाधव (वय-20 रा. हिंगणे-खुर्द), अक्षय तायाजी आखाडे (वय-21स पा, महादेवनगर, हिंगणे खुर्द), सुनिल धारासिंग पवार (वय-19 रा. रायकर मळा, धायरी गाव), साहिल बबन उघडे व 8 विधीसंघर्षीत मुलांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख चेतन ढेबे याने स्वत:च्या आणि टोळीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी सिंहगड रोड परिसरात मारामारी, खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), कोयता आणि इतर घातक शस्त्रे बाळगणे अशाप्रकारचे गंभीर गुन्हे (Pune Crime) केले आहेत. त्यांच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र, त्यांच्यात काहीच सुधारणा झाली नाही. त्यांनी पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहे. दरम्यान दहिहंडी उत्सवामध्ये आरोपी चेतन ढेबे याने गोळीबार केला होता.

चेतन ढेबे आणि त्याच्या टोळीवर मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe) यांनी उपायुक्त पौर्णिमा गायकवाड (DCP Pournima Gaikwad) यांच्यावतीने अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांना पाठवला होता. त्यानुसार टोळी प्रमुख चेतन ढेबे आणि त्याच्या टोळीतील 16 असे एकूण 17 जणांवर मोक्का कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar) करीत आहेत.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे,
पोलीस उपायुक्त परीमंडळ 3 पौर्णिमा गायकवाड, सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार,
यांच्या सुचनेनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, तत्कालीन पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे
(Police Inspector Pramod Waghmare), पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर
(Police Inspector Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam), सर्व्हेलन्स पथकाचे मिनाक्षी महाडीक,
स्मिता चव्हाण गुरव यांनी केली.

आयुक्तांची 96 वी मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 96 तर चालु वर्षात 33 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s 96th action till date against Criminals in pune under mcoca; Chetan Dhebe gang who opened fire in Dahihandi festival also booked under mcoca

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Uddhav Thackeray | विजय आपलाच होणार, कितीही अफजल खान आले तरी…, सुप्रीम कोर्टातील सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरेंची अमित शहांवर टीका

Raw Food Side Effects | ‘हे’ 5 हेल्दी फूड्स चुकूनही कच्चे खाऊ नका, होऊ शकते गंभीर नुकसान!

Joint Pain | नवजीवन वेदनाहर तेल व चुर्ण सांधेदुखीवर रामबाण उपाय, एकदा वापरा सांधेदुखीला करा कायमचा राम राम