Pune Crime | पुण्यातील हिंगणे परिसरातील निरज ढवळे व त्याच्या 7 साथीदारांवर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 113 वी कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीत दहशत पसरवणारा सराईत गुन्हेगार निरज लक्ष्मण ढवळे याच्यासह त्याच्या 7 साथीदारांवर मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी चालू वर्षामध्ये 50 टोळ्यांवर कारवाई केली आहे. तर आजपर्यंत 113 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

टोळी निरज लक्ष्मण ढवळे (वय-22 रा. अविनाश संकुल शेजारी, हिंगणे खुर्द, पुणे), सुरज संतोष ढवळे (वय-19 रा. वाघजाई मंदिराजवळ, हिंगणे खुर्द, पुणे), अनिकेत/अ‍ॅण्डी देविदास कांबळे (वय-20 रा. वडगाव बुद्रूक पुणे), किरण विठ्ठल शिंदे (वय-20 रा. भुमकर मळा, नऱ्हे, पुणे), अतिश राम पवार (वय-20 रा. वडगाव, पुणे) व इतर तीन अल्पवयीन मुलांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. (Pune Crime)

निरज ढवळे व त्याच्या साथीदाराने सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्वत:चे तसेच टोळीचे वर्चस्व व्हावे व अवैध मार्गाने इतर फायदा व्हावा यासाठी गंभीर गुन्हे केले आहेत. खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), मारामारी, बेकायदा शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीविरुद्ध यापूर्वी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करण्यात आली होती. मात्र त्यांच्यामध्ये काहीच सुधारणा झाली नाही. (Pune Crime)

निरज ढवळे टोळीवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भागव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe) यांनी परिमंडळ 3 पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे (Addl CP Rajendra Dahale) यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाला अपर पोलीस आयुक्तांनी मंजूरी दिल्याने आरोपींविरुद्ध मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सिंहगड रोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार (Sinhagad Road Division ACP Sunil Pawar) करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे,
पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (Police Inspector Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam),
पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesha Mokashi), महिला पोलीस अंमलदार मिनाक्षी महाडीक,
स्मिता चव्हाण, गुरव यांच्या पथकाने केली.

आयुक्तांची 113 मोक्का कारवाई

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर
गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत. शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या
व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 113 तर चालु वर्षात 50 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई
करण्यात आली आहे.

Web Title :- Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s MCOCA Action against Niraj Dhavale and his 7 accomplices in Hingane area of ​​Pune.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pankaja Munde | छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या मुद्यावरून पंकजा मुंडे गोपिनाथ गडावर अर्धातास मौन पाळणार

Jitendra Awhad | ‘शाईफेक करणार्‍यावर 307 चा गुन्हा योग्य नाही’ – जितेंद्र आव्हाड