Pune Crime | पप्पु येनपूरे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची मोक्का कारवाई, आतापर्यंत 49 टोळ्यांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील गुन्हेगारावर (Pune Crime) आळा घालण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta) यांनी गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा (MCOCA Action) Mokka बडगा उचलला आहे. दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राद्वारे कात्रज (Katraj), आंबेगाव (Ambegaon) परिसरात दहशत माजविणाऱ्या पप्पू येनपूरे (Pappu Yenpure) टोळी विरुद्ध पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशाने मोक्का अंतर्गत कारवाई (Pune Crime) करण्यात आली आहे.

टोळीप्रमुख प्रविण ऊर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय – 27, रा. अटल चाळ, आंबेगाव खुर्द) व त्याचे साथीदार अजित अंकुश धनावडे Ajit Ankush Dhanawade (वय – 24, रा. सच्चाईमाता नगर, आंबेगाव खुर्द), अभिजीत नंदु बोराटे Abhijeet Nandu Borate (वय -31, रा. आंबेगाव खुर्द) अशी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत.

पप्पू येनपूरे हा 2016 पासून संघटतपणे गंभीर स्वरुपाचे गुन्हे करत आहे. आरोपी येनापूरे हा प्रत्येक गुन्हा करत असताना सोबत वेगवेगळ्या साथिदारांची मदत घेत होता. तो गुन्हेगारांना संघटीत करुन टोळीची दहशत व वर्चस्व करण्यासाठी गुन्हे करत होता. पप्पू येनापुरे टोळीवर दरोड्याची तयारी, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्र, दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत.पप्पू येनापूरे टोळीवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive action) करण्यात आली होती. तसेच त्याला तडीपार करण्यात आले होते. मात्र, त्याच्या गुन्हेगारी वर्तनात काहीही फरक पडला नाही.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे (bharti vidyapeeth police station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Police Inspector Jagannath Kalaskar), पोलीस निरीक्षक संगीता यादव (police inspector Sangeeta Yadav), विजय पुराणीक (Vijay Puranik), सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, वैभव गायकवाड, पोलीस अंमलदार कृष्णा बढे, महेश बारवकर, निलेश ढमढेरे, अनिल शेडगे यांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला.
पोलीस उपायुक्त सागर पाटील (DCP Sagar Patil) यांच्यामार्फत तो अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे (Addl CP Dr. Sanjay Shinde) यांच्याकडे सादर केला.
डॉ. शिंदे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन त्याला मंजूरी दिली.
या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) करीत आहेत.

आतापर्यंत 49 टोळ्यांवर मोक्का

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत.
शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 49 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Web Title : Pune Crime | Pune Police Commissioner Amitabh Gupta’s
mcoca action against Pappu Yenpure gang, action against 49 gangs so far

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Mumbai Crime Branch Police | दोन तासाचे 2 लाख रुपये;
मुंबईतील अभिनेत्री आणि टॉप मॉडेलच्या सेक्स रॅकेटबाबत धक्कादायक खुलासा