Pune Crime | अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर गुन्हे शाखेची कारवाई, 18 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात गुटखा घेऊन येत असलेल्या दोन गाड्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell) पकडून गुटख्यासह (Gutkha Seized) 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संजय हनुमंत ओरसे (वय 35, रा. जनवाडी) आणि विनोद जयवंत ढोले (वय 39, रा. जनवाडी) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

याबाबतची माहिती अशी की, खंडणी विरोधी पथक एक कडील अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत असताना शिवाजीनगर न्यायालयाच्या मागील बाजूस दोन गाड्या थांबल्या असून त्यात बंदी असलेला गुटखा असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने ईरटीका (Ertika) व व्हॅगनार (Wagner) या गाड्या ताब्यात घेऊन तपासणी केली. त्यात केशरयुक्त विमल पान मसाला, तंबाखू, असा 5 लाख 4 हजार रुपयांचा सुगंधी गुटखा/तंबाखु व या गाड्या असा 18 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ
पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी
पथक- 1 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Police Inspector Ajay Waghmare),
सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijit Patil), पोलीस उप निरीक्षक विकास जाधव
(PSI Vikas Jadhav),
पोलीस अंमलदार संजय भापकर, प्रविण ढमाळ, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांच्या पथकाने केली.

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch action against two vehicles illegally transporting Gutkha, seized goods worth 18 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Manasi Naik | घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

Sanjay Raut On Gajanan Kirtikar | ‘शिवसेनेत सर्व काही भोगून किर्तीकर गेले, जाऊद्या, लोक उद्या त्यांना…’ – खा. संजय राऊत