Pune Crime | बिबवेवाडीत युवकावर गोळीबार करुन जंगलात लपलेल्या आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, 6 जणांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दारु पिण्यास पैसे मागितल्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून युवकावर गोळीबार (Firing in Pune) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास घडली होती. तसेच 10 ते 12 जणांच्या टोळक्याने हातात पिस्टल (Pistol), कोयते, तलवार (Sword), घेऊन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यातील 6 आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

 

सौरभ दत्तू सरवदे (वय-22 रा. राम मंदिराजवळ, पर्वती पायथा, पर्वती (Parvati), पुणे), मुन्ना उर्फ अनिस फारुख सय्यद (वय-19), बाबु उर्फ आकाश सुरेश शिळीमकर (वय-21), जंब्या उर्फ ऋषिकेश विठ्ठल साळुंखे (वय-21 तिघे रा. जनता वसाहत, दत्तवाडी) यांना बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. तर आकाश सुरजनाथ सहाणी (वय-24 रा. राम मंदिरामागे, पर्वती), बाब्या उर्फ आदित्य संजय नलावडे (वय-20 रा. पर्वती पायथा, पर्वती) यांना गुन्हे शाखा युनिट 5 व युनिट 3 (Pune Police Crime Branch) च्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी अमित कैलास थोपटे Amit Kailas Thopte (वय-32 रा. शिव शंकर सोसायटी, गल्ली क्र.2 बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास वाघजाई मंदिर (Waghjai Temple) येथे अमित थोटपे आणि त्याचा मित्र सुरज शेटे याची सौरभ सरवदे व रुपेश सोनवणे यांच्यासोबत दारु पिण्यासाठी पैसे मागितल्याच्या कारणावरुन भांडण झाले होते. या भांडणावरुन आरोपी सौरभ शिंदे, गणेश जगदाळे हे 6 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास 10 ते 12 साथिदारांसह दुचाकीवरुन आले. आरोपींनी थोपटे याला मारण्याच्या (Attempt to Murder) उद्देशाने दोन गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

 

आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या पथकाने जनता वसाहत पिंजून काढला. मात्र, आरोपींची या ठिकाणी दहशत असल्याने स्थानिक नागरिकांनी माहिती दिली नाही. दरम्यान, पोलीस अंमलदार सतीश मोरे (Satish More) व श्रीकांत कुलकर्णी (Srikant Kulkarni) यांना या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सौरभ सरवदे हा आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला चारी बाजूने घेराव घालून ताब्यात घेतले.

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने गणेश जगदाळे, मुन्ना सय्यद, आकाश शिळीमकर, जंब्या साळुंखे, आकाश सहानी, बाळू नलावडे, गौरव बुगे, रोहन लोंढे, रोहित औचरे, अजय आखाडे व इतर साथिदारांच्या मदीने गुन्हा केल्याची कबुली दिली. फरार आरोपींचा शोध घेत असताना मुन्ना सय्यद, आकाश शिळीमकर व जंब्या साळुखे हे दिवसभर सिंहगडावर जंगलात (Sinhagad Forest) थांबतात व अपरात्री घरी येऊन पुन्हा जंगलात जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पहाटे सापळा रचून या तिंघाना अटक केली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्टल, कोयता आणि तलवार जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil), सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गलांडे (ACP Rajendra Galande)
यांच्या मार्गदर्शनानुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे (Senior Police Inspector Sunil Jhaware),
पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर (Police Inspector Anita Hivarkar)
यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळूखे (API Pravin Kalukhe),
पोलीस हवालदार शाम लोहोमकर, गणेश दुधाणे, अमित पुजारी, तानाजी सागर, सतीश मोरे, अतुल महांगडे व श्रीकांत कुलकर्णी यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch and Bibvewadi Police arrested 6 criminals in firing case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा