Pune Crime | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक- 2 नं कोल्हापूरच्या ‘डॉक्टर डॉन’ला इंदूरमधून घेतले ताब्यात; गज्या मारणेसह खंडणी प्रकरणात सहभाग निष्पन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शेअर ट्रेडिंगमध्ये (Share Trading) गुंतविलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचे अपहरण (Kidnapping Case) करणार्‍या कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीचे (Gajanan Marne Gang) चंदगड (Chandgad) कनेक्शन पुढे आले आहे. या अपहरण प्रकरणात चंदगडमधील डॉक्टर डॉनचा (Kolhapur Doctor Don) सहभाग निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक – 2 ने (Anti Extortion Cell Pune) त्याला मध्यप्रदेशातील इंदूर (Indur MP) येथून ताब्यात घेतले आहे. (Pune Crime)

 

खंडणी प्रकरणात प्रकाश बांदिवडेकर याला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलिस उपनिरीक्षक शेळके आणि कर्मचार्‍यांनी ताब्यात घेतले आहे.

प्रकाश बांदिवडेकर Prakash Bandivadekar (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. तो सराईत गुन्हेगार असून गेल्या काही वर्षांपासून फरार आहे. त्याच्यावर खून (Murder), खंडणी असे १० ते १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Crime)

 

गुंड गजानन मारणे याने सांगली व पुण्यात शेअर व्यवसाय करणार्‍या एका व्यावसायिकाचे वसुलीसाठी अपहरण केले होते. त्याला मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यात खंडणी विरोधी पथकाने चौघांना अटक केली आहे. त्यात या व्यावसायिकाचे अपहरण केल्यानंतर तपासात प्रकाश बांदिवडेकर यानेही धमकाविल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता तो इंदूरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने इंदूरमधून त्याला ताब्यात घेतले आहे.
या गुन्ह्यात १४ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. प्रकाश बांदिवडेकर हा १५ आरोपी आहे.

खंडणी प्रकरणात सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३, रा. धनकवडी),
हेमंतऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलुस, जि. सांगली),
अमर शिवाजी किर्दत (वय ४६, रा. कोडोवली, जि. सातारा),
फिरोज महंमद शेख (वय ५०, रा. समर्थनगर,कोडोवली, जि.सातारा),
गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड) (टोळीप्रमुख),
रुपेश कृष्णाराव मारणे (रा.कोथरुड), संतोष शेलार (रा.कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दोपोडी),
अजय गोळे (रा.नर्हे), नितीन पगारे (रा.सातारा), प्रसाद खंडागळे (रा.तळजाई पठार, सहकारनगर),
नवघणे यांच्यावर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune police crime branch anti extortion cell 2 arrested
Kolhapur’s ‘Doctor Don’ Prakash Bandivadekar from Indore (Indur MP);
Involvement in extortion case including gangstar gajanan marne and others

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा