Pune Crime | ‘मोक्का’मधील फरारी अक्षय खवळेला शिवणे परिसरातून अटक; पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मोक्का (MCOCA) Mokka गुन्ह्यात फरार असलेल्या पुण्यातील (Pune Crime) सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने (Anti extortion Cell Pune) मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई गुरुवारी (दि.23) पुण्यातील (Pune Crime) शिवणे येथील शिंदे पुलाजवळ केली. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. (Pune)

 

अक्षय रविंद्र खवळे Akshay Ravindra Khawale (रा. रामनगर, वारजे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी कर्मचारी गुरुवारी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी उत्तमनगर पोलीस ठाण्यात (Uttamnagar police station) दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपी अक्षय खवळे हा शिवणे येथील शिंदे पुलाजवळ (Shinde Bridge) येणार असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (bharati vidyapeeth police station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलगा पुण्यातील (Pune Crime) वारजे येथे भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा (API Sandeep Buwa),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), पोलीस अंमलदार अमोल आव्हाड,
विजय कांबळे, नितीन कांबळे, रमेश चौधर, गजानन सोनवलकर, दुर्योधन गुरव, अमर पवार यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | pune police crime branch anti extortion cell arrest Akshay Khawle from Shivne area mokka criminal mcoca

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO मध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट; UAN द्वारे होईल काम; जाणून घ्या

Pune Crime | पिंपरी-चिंचवडच्या ‘सासु’ विभागाकडून 1 लाखाचा गुटखा जप्त; एकाला अटक अन् पुण्याच्या रास्ता पेठेतील बडा डिलर मिथुन नवलेविरूध्द गुन्हा दाखल

MPSC Recruitments | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये 900 पदांवर मेगा भरती, 11 जानेवारीपर्यंत करू शकता अर्ज