Pune Crime | कोयते, चॉपर, चाकू विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यात घातक शस्त्र विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला (criminal) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनच्या (Anti extortion Cell) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून कोयते, चॉपर आणि चाकू असा एकूण सहा हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई पुण्यातील ताडीवाला रोडवर केली. (Pune Crime)

अवतारसिंग कांचनसिंग जुनी (वय-42 रा. राजनगर, ओटा स्किम, सेक्टर नं. 22, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. आरोपीवर निगडी पोलीस ठाण्यात (Nigdi police station) गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे (Shailesh Surve) यांना सराईत गुन्हेगार ताडीवाला रोडवरील (Tadiwala Road) हॉटेल नुर मंजील जवळ घातक शस्त्रांची विक्री करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या मोपेड (एमएच 14 एचएफ 9828) च्या डिकीची तपासणी केली. त्यावेळी कापडी पिशीवत ठवलेले 2 कोयते, 4 चॉपर, 4 चाकू असे 10 धारदार शस्त्रे आढळून आली. त्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) गुन्हा (Pune Crime) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Shrinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळूंके, विजय गुरव, राहुल उत्तरकर, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, सौदोबा भोजराव, प्रदिप गाडे, अमोल पिलाने, चेतन शिरोळकर, मोहन येलपल्ले, महिला पोलीस अंमलदार रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Jersey | actor shahid kapoor shared the new poster of the film jersey on instagram

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Sitaram Kunte | निवृत्तीनंतर सीताराम कुंटे यांची ‘या’ महत्त्वाच्या पदी नियुक्ती

Maharashtra Rains | पुणे, मुंबई, नाशिकसह कोकणात पाऊस सुरु

IMD | पालघर, ठाणे आणि मुंबईत आज होऊ शकतो मुसळधार पाऊस; जाणून घ्या इतर ठिकाणचा अंदाज

LPG Price | एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याच्या सर्वसामान्यांच्या अपेक्षेला जोरदार झटका ! 100 रुपयांनी महागला कमर्शियल सिलेंडर; जाणून घ्या

Health Test In 30 Sec | ‘या’ 3 सोप्या चाचण्या 30 सेकंदमध्ये सांगतील किती हेल्दी आहात तुम्ही? घरीच करा आरोग्य तपासणी; जाणून घ्या

Sameer Wankhede | समीर वानखेडेंची राज्य सरकारच्या ‘या’ समितीकडून चौकशी

Omicron Variant | भारतात आज मध्यरात्रीपासून प्रवाशांसाठी नवे नियम लागू, जाणून घ्या नवीन नियमावली

Omicron Variant | भारतात केवळ 20% लोकसंख्येला ओमिक्रॉनचा धोका, व्हेरिएंटचे ‘सॉफ्ट टार्गेट’ कोण? जाणून घ्या