Pune Crime | मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या नोकरासह त्याच्या साथिदारांना गुन्हे शाखेकडून अटक, 22 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरमालकाच्या घरातील सोने-चांदीचे दागिने (Gold – Silver Jewellery) आणि रोख रक्कम चोरणाऱ्या नोकरासह त्याच्या इतर पाच साथिदारांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकने (Anti Extortion Cell) अटक केली आहेत. ही घटना 29 ऑक्टोबर रोजी (Pune Crime) उघडकीस आली होती. याबाबत स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) आयपीसी 380, 381, 411, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा तपास करत असताना फिर्यादी यांच्या घरात काम (Servant) करणारा चंदू बालाजी मेडेंवाढ याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तसेच त्याने हा गुन्हा त्याच्या इतर साथिदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली. (Pune Crime)
पोलिसांनी आरोपीचे साथिदार सारिका आप्पासाहेब सावंत (सध्या रा. काळेपडळ, मुळ रा. शेगाव ता. जत जि. सांगली), भावना रविंद्र कोद्रे (रा. काळेपडळ मुळ रा. गांधी चौक, मुंढवा), जनार्दन नारायण कांबळे (रा. शाहूनगर, सांगली, मुळ रा. मु.पो. कोसारी, ता. जत), ऋषिकेश राजाराम तोरवे (रा. मु.पो. कोसारी, ता. जत), दुर्गाचरण रविंद्र कोद्रे (रा. काळेपडळ, मुळ रा. गंधी चौक, कोंढवा) यांना अटक केली. आरोपींकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्यातील सोन्याचे दागिने सोनार प्रवीण पोपट दबडे, प्रतिम पोपट दबडे यांना विकल्याची माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने सोनारांना अटक करुन त्यांच्याकडून 22 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास खंडणी विरोधी पथक एकचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे
(Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी
विरोधी पथक- 1 चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील
(API Abhijit Patil), पोलीस उप निरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), यशवंत ओंबासे
(PSI Yashwant Ombase), पोलीस अंमलदार प्रवीण ढमाळ, मधुकर तुपसौंदर, प्रमोद सोनवणे, रविंद्र फुलपगारे,
संजय भापकर, हेमा ढेबे, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे,
प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केलेली आहे.
Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrest Criminals
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Manasi Naik | घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट आली चर्चेत