Pune Crime | पुण्याच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून 5 कोटीच्या प्रकरणात खासगी सावकार नाना वाळके, अनिकेत हजारेला अटक

0
191
Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell arrest Ramdas alias Nana Gopinath Walke and Aniket Ramesh Hazare in money laundering case of chaturshringi police station
file photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अनेकांना पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाट व्याजाची मागणी करुन धमकाविणार्‍या नानासाहेब गायकवाड (Nanasaheb Gaikwad) याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आता औंधमधील (Aundh News) आणखी एका हाय प्रोफाईल व्यक्तीवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) सावकारी प्रकरणी (Money Lenders in Pune) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोन (Anti extortion Cell) ने कारवाई करुन दोन जणांना अटक केली आहे. (Pune Crime)

 

रामदास ऊर्फ नाना गोपीनाथ वाळके Ramdas alias Nana Gopinath Walke (वय 37 रा. जय गणेशनगर, विधातेवस्ती, औंध) आणि त्याचा साथीदार अनिकेत रमेश हजारे Aniket Ramesh Hazare (वय 38, रा. हजारे सदन, दापोडी) अशी अटक केलेल्यांची (Pune Crime) नावे आहेत. हा प्रकार ऑगस्ट 2015 ते 10 डिसेंबर 2021 दरम्यान घडली आहे. याप्रकरणी बालेवाडी (Balewadi News) येथील एका 35 वर्षाच्या व्यावसायिकाने खंडणी विरोधी पथक दोनकडे तक्रार केली होती. पथकाने तक्रारदार यांनी दिलेल्या पुराव्यानुसार चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी नाना वाळके (Nana Walke) याच्याकडून 1 कोटी 75 हजार रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबदल्यात फिर्यादी यांनी वाळके याला 1 कोटी 11 लाख 2 हजार रुपये व्याज असे एकूण 2 कोटी 86 लाख 2 हजार रुपये परत केले होते. त्यानंतर फिर्यादी यांनी ऑगस्ट 2017 मध्ये अनिकेत हजारे यांच्याकडून 3 कोटी 50 लाख रुपये घेतले होते. या रक्कमेच्या मोबतल्यात तक्रारदार यांनी हजारे याला 5 कोटी 10 लाख रुपये परत केले. असे असतानाही अनिकेत हजारे याने फिर्यादीच्या नावावर असलेल्या गाड्यांचे आर सी बुक, चेक घेतले. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने प्रॉमिसरी नोट (Promissory Note) लिहून घेतली.

फिर्यादी यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या प्रकाशित केल्या. शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्याकडे 4 कोटी 75 हजार रुपयांची मागणी केली. त्यावर नाना वाळके यांनी फिर्यादी यांना तू अनिकेत हजारे याला पैसे देऊन विषय संपव. नाही तर तो इतर लोकांना एकत्र आणून तुझ्याविरुद्ध 10 ते 15 खोट्या तक्रारी दाखल करीन, तुझा गेम टाकायला कमी करणार नाही. स्वत:चा व कुटुंबाचा विचार कर, अशी धमकी देऊन फिर्यादीची आर्थिक पिळवणूक (Pune Crime) केली. या प्रकारानंतर फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक दोनच्या पोलिसांकडे धाव घेतली. खंडणी विरोधी पथकाने चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात खंडणी (Extortion Case) व सावकारी अधिनियमाखाली (Money Laundering) गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. आरोपी नाना वाळके याच्यावर यापूर्वी 4 तर अनिकेत हजारे याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे,
विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, सैदाबा भोजराव, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, प्रवीण पडवळ, प्रदिप गाडे,
मोहन येलपल्ले, चेतन शिरोळकर, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell arrest Ramdas alias Nana Gopinath Walke and Aniket Ramesh Hazare in money laundering case of chaturshringi police station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Police | मला आणि माझ्या कुटुंबाला देवेन भारतींपासून धोका; तक्रारदाराची पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी

Pune Crime | अहमदाबाद ‘सीपी’ विजयसिंग बोलतोय..! पैसे पाठव, पोलिसांना गंडा घालणारा गजाआड

Pune Navale Bridge Accident | ‘पुण्यातील नवले पुलावरील अपघातांचे सत्र कधी थांबणार? शिवसेनेचे ‘NHAI’ कार्यालयावर जनआक्रोश आंदोलन