Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-2 कडून गजाआड, पिस्टल आणि काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाच्या (Murder) गुन्ह्यात पॅरोलवर बाहेर आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल (Pistol) आणि काडतुस जप्त (Cartridge Seized) करण्यात आली आहेत. ही कारवाई येरवडा (Yerwada) येथील मच्छी मार्केट गाडीतळ येथे करण्यात (Pune Crime) आली आहे.

 

रितीक राजु साठे Hrithik Raju Sathe (वय – 21 रा. मच्छी मार्केट समोर, येरवडा) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) भारतीय हत्यार कायदा कलम (Arms Act), महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अधिकारी अंमलदार हे येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेल्ट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Pune Criminals) मच्छी मार्केट गाडीतळ येथे थांबला असून त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल व काडतुसे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी रितीक साठे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले.

आरोपी रितीक साठे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो काही दिवसांपुर्वी येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात पॅरोलवर (Parol) बाहेर आला आहे. तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav) पोलीस अंमलदार सचिन अहिवळे, विजय गुरव, प्रदिप शितोळे, शैलेश सुर्वे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंके, अनिल मेंगडे, संग्राम शिनगार, सैदोबा भोजराव, सुरेंद्र साबळे, अमोल पिलाणे, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किसोर बर्गे, पवन भोसले, रवि सपकाळ व महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : –  Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrested Criminal In Murder Case Yerwada Jail Parol

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा