Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हवेली तालुक्यातील पेरणे येथून एका चंदन तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. लक्ष्मण भिमा गायकवाड (Laxman Bhima Gaikwad) (वय, 42 रा. तरडोबाचीवाडी ता. शिरूर) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम चंदनाचे तुकडे आणि एक कार असा एकूण पाच लाख 59 हजाराचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) करण्यात आला असून आरोपी गायकवाडविरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा (FIR) दाखल झाला आहे. ही कारवाई पुणे शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाच्या युनिट दोनने (Anti Extortion Cell Pune) केली आहे.

 

याबाबत माहिती अशी, गायकवाड याच्या कारमधून ओल्या चंदनाच्या लाकडाचे तुकडे जप्त करण्यात आले आहे. आरोपी गायकवाड हे कारने चंदन तस्करी करून विक्री व खरेदी करण्यासाठी पुण्यातील नगररोड (Pune-Nagar Road) परिसरात येणार अशी माहिती खंडणी विरोधी पथकाच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीनूसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस नगररोडवर पेंट्रोलींग करीत पेरणे फाटा (Perne Phata) येथे दाखल झाले. त्यावेळी आरोपी गायकवाड कारने पेरणे येथून भरधाव जात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी पोलिसांनी कारला थांबवण्याचा प्रयत्न केला असता कार न थांबविता तेथून सुसाट सुटली. (Pune Crime)

 

त्यानंतर पोलिसांनी संबधित कारचा पाठलाग करुन पेरणेच्या वाळके वस्ती येथील नगररोडवर आरोपी गायकवाडला पकडण्यात आले. त्याला अटक (Arrested) करून त्याच्याकडून 102 किलो 400 ग्रॅम ओलसर चंदनाचे तुकडे व एक कार असा एकूण 5 लाख 59 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, गायकवाडवर यापुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) मंचर पोलिस ठाण्यात (Manchar Police Station) व अहमदनगरच्या पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) चंदन तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डाॅ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr. Ravindra Shisve),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे (API Laxman Dhengale), पोलीस अमंलदार विजय गुरव (Vijay Gurav),
प्रदिप शितोळे (Pradeep Shitole), शैलेश सुर्वे (Shailesh Surve), विनोद साळुंके (Vinod Salunkhe),
राहुल उत्तरकर (Rahul Uttarkar). संग्राम शिनगारे Sangram Shingare), सैदोबा भोजराव (Saidoba Bhojrao),
अमोल पिलाने (Amol Pilane), प्रविण पडवळ (Praveen Padwal), चेतन शिरोळकर (Chetan Shirolkar),
प्रदिप गाडे (Pradeep Gade), मोहन येलपल्ले (Mohan Yelpalle), रुपाली कर्णवर (Rupali Karnavar) यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Anti Extortion Cell Arrests One In Sandalwood Smuggling Case, Seizes 102 Kgs Of Sandalwood Wood

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Winter Diseases | हिवाळ्यात जर नेहमी राहात असतील तुमचे हात-पाय थंड तर जाणून घ्या त्याची कारणे आणि बचावाची पद्धत

 

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

 

Pune Crime | जागेत अतिक्रमण करून बेकायदा ऑफिस बांधले ! सुमेरू बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडच्या विजय रायकर यांच्यासह तिघांविरूध्द गुन्हा