Pune News | पुण्यात भर वस्तीत खून करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पूर्व वैमनस्यातून पुण्यातील नाना पेठेत एका सराईत गुन्हेगाराचा वार करुन, दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फरार मुख्य सुत्रधारासह दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. ही घटना (Pune Crime) मंगळवारी (दि.22) मध्यरात्रीच्या सुमारास राजेवाडी परिसरात घडली आहे.

 

रोहन रवींद्र पवार (राजेवाडी, नाना पेठ) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात आयपीसी 302, 143, 144, 147, 148, 149, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भर वस्तीमध्ये घडलेल्या खुनाच्या घटनेमुळे खळबळ उडाली होती. (Pune News)

 

खुनाच्या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखा युनिट एकचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपींचा शोध घेण्यासाठी चार टिम तयार करण्यात आल्या. या टिमने आरोपींचा शोध घेऊन तीन आरोपींना उंड्री चौकातून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार सुशांत उर्फ मट्या शशीकांत कुचेकर (वय-28 रा. राजेवाडी, नाना पेठ, पुणे) याच्यासह तेजस अशोक जावळे (वय-32 रा. 857, नाना पेठ), अतिष अनिल फाळके (वय-27 रा. 838, नाना पेठ) यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी समर्थ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

आरोपींपैकी सुशांत कुचेकर याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, दरोडा, गंभीर दुखापत, मारामारी, विनयभंग, विनापरवाना शस्त्र बाळगणे असे एकूण 16 गुन्हे पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर तेजस जावळे याच्यावर 7 गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपींना पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वेळा दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले,
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, रमेश तापकीर,
अजय जाधव, पोलीस अंमलदार इम्रान शेख, महेश बामगुडे, राहुल मखरे, अजय थोरात, आय्याज दड्डीकर,
विठ्ठल साळुंखे, अमोल पवार, शशिकांत दरेकर, अनिकेत बाबर, अभिनव लडकत, दत्ता सोनावणे,
निलेश साबळे, शुभम देसाई, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest 3 Criminals Who Are Abscond In Murder Case Samarth Police Station Nana Peth Pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune News | बारामतीत नवविवाहितेबरोबर नियतीचा खेळ; लग्नाला आठवडा पण झाला नसताना नवऱ्याचा अकाली मृत्यू

Amit Shah | श्रद्धा वालकर हत्येवर गृहमंत्री अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया

Mahavitaran Employee – Court News | वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस 3 वर्षे सश्रम कारावास