Pune Crime | हडपसर परिसरातील पादचार्‍यांना लुटण्याचा प्रयत्न करणार्‍या सराईत गुंडाची टोळी जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | हडपसर (Hadapsar) येथील कॅनालजवळून जाणार्‍या पादचार्‍यांना लुटण्यासाठी एकत्र आलेल्या गुंडाच्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट २ (Pune Police Crime Branch) च्या पथकाने जेरबंद केले आहे. अर्जुन शिवाजी कांबळे Arjun Shivaji Kamble (वय २२, रा. हडपसर भाजी मंडई), मैनुउद्दीन इरफान पठाण Mainuddin Irfan Pathan (वय २४), गणेश बालाजी भांडेकर Ganesh Balaji Bhandekar (वय २०), हर्षद शिवशंकर टेकांळे Harshad Shivshankar Tekanle (वय १९, सर्व रा. भाजी मंडई, हडपसर) अशी अटक (Arrest) केलेल्यांची नावे आहेत. हे चौघेही पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Pune Criminals) आहेत. त्यांचा साथीदार बाबा गफार पठाण Baba Gaffar Pathan (वय १९) हा पळून गेला. (Pune Crime)

 

याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकातील पोलीस नाईक गणेश थोरात (Police Naik Ganesh Thorat) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८०२/२२) दिली आहे. (Pune Crime)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेच्या युनिट २ चे पथक हे हडपसर भाजी मंडळ परिसरात रविवारी रात्री गस्त घालत होते.
त्यावेळी भाजी मंडईच्या मागील बाजूला पांढरे मळा कॅनालजवळ काही जण अंधारात लपून बसल्याचे पोलिसांना आढळून आले.
त्यांनी चारही बाजूने घेरुन त्यांना पकडले. यावेळी बाबा पठाण हा पळून गेला. या चौघांकडून लोखंडी कोयता, मिरची पावडरची पुडी,
कटर, लोखंडी रॉड, दोन मोबाईल असा २० हजार ५६५ रुपयांचा माल जप्त केला आहे.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता ससाणेनगरकडे जाणार्‍या पादचार्‍यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याच्या तयारीत थांबल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक शिंदे (Sub-Inspector of Police Shinde) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Pune police crime branch arrest A gang of thugs for trying to rob pedestrians hadapsar area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Minor Girl Rape Case | ‘इंस्टाग्राम’वर मैत्री झालेल्या मित्राने शारीरीक संबंध ठेवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती

Shivsena Whip Sunil Prabhu | शिवसेना अ‍ॅक्शन मोडवर ! बंडखोर 39 आमदार अडचणीत, आमदारकी रद्द करण्यासाठी याचिका दाखल

Shivsena MLA Balaji Kalyankar | बालाजी कल्याणकर यांना निवडणुकीत पक्षाने दीड कोटी दिले, तरीही गद्दार झाले