Pune Crime | 50 लाखाचे खंडणी प्रकरण ! पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुधीर रामचंद्र आल्हाटला अटक; माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | लेटरहेडवर डेक्कन ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज पाठीमागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर रामचंद्र आल्हाट (Sudhir Ramchandra Alhat) याला बुधवारी रात्री अटक (Arrest) केली आहे. त्याच्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर (Subhash alias Anna Jeur), निलेश जगताप (Nilesh Jagtap), विवेक कोंडे (Vivek Konde) यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivajinagar Police Station) खंडणीचा गुन्हा (Extortion Case) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

यासंदर्भात कोथरूड परिसरातील एका 48 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या पतीवर 2018 आणि 2020 मध्ये डेक्कन पोलिस ठाण्यात (Deccan Police Station) अन्यायाने दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत फिर्यादीने सुधीर आल्हाट याच्याकडे संपर्क केला होता. त्यावेळी आल्हाट याने डेक्कन पोलिस ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonvane) यांच्या विरुध्द तक्रारी अर्ज केल्यानंतर तुम्हाला त्रास दिल्याचे 8 दिवसांत पैसे काढून देतो. माझ्या पोलीस खात्यात मोठ्या पदावरील तसेच अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत. मी आत्तापर्यंत 32 अधिकारी निलंबीत केले असल्याचे सांगितले. फिर्यादी महिलेला उपनिरीक्षक सोनवणे यांच्या विरुध्द सुधीर रामचंद्र आल्हाटने लेटरहेडवर अर्ज करण्यास भाग पाडले. (Pune Crime)

 

 

त्यानंतर आल्हाटने फिर्यादी महिलेला घरी बोलावून सोनवणे अर्ज प्रकरणात 50 लाखांच्या खंडणीची मागणी केली. मला पैसे दिले तरच तुम्ही सोनवणे व पालवे यांच्या विरुध्द केलेले अर्ज मागे घेवून देईल असे सांगितले. मी सांगितल्याप्रमाणे वागला नाहीत तर तुम्हाला पण लटकवून टाकीन अशी धमकी दिली. इतर आरोपींनी देखील फिर्यादीवर दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आल्हाट याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे (PSI Dattatraya Kale) करत आहेत.

 

 

सुधीर रामचंद्र आल्हाटने फिर्यादी महिलेला आतापर्यंत आपण 32 अधिकारी निलंबित केल्याचे सांगितले आहे.
आपल्या अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी ओळखी असल्याचे सांगून 50 लाखाची खंडणी (Ransom Case)
मागितल्या प्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक झाल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

आल्हाट हा एका मोठ्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे.
तो कोण-कोणत्या अधिकाऱ्याची नावे घेत होता हे पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे.

 

Web Title :- Pune Crime | pune police crime branch arrest adv sudhir ramchandra alhat in 50 lakhs extortion case ransom

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा