Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) दरोडा व वाहनचोरी पथक एकने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) अटक केली आहे. गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाला होता. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) बालाजीनगर येथील के. के मार्केट (KK Market Balajinagar) येथे करण्यात आली. गणेश रामलु मोडावत Ganesh Ramlu Modavat (वय-29 रा. शिवमल्हार कॉम्पलेक्स, पुण्याईनगर, बालाजीनगर, धनकवडी Dhankawadi) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक एकचे पोलीस घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार निलेश शिवतरे (Police Constable Nilesh Shivtare) व सुमित ताकपेरे (Sumit Takpere) यांना माहिती मिळाली की, दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नातील (Attempt Murder) फरार आरोपी बालाजीनगर येथील के. के. मार्केट जवळ उभा आहे. माहितीची शहानिशा करुन पोलिसांनी के. के. मार्केट परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीला पुढील कार्यवाहीकरीता दत्तवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे (Senior Police Inspector Ajay Waghmare), पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक गणेश ढगे, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, महिला पोलीस अंमलदार तेजाराणी डोंगरे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police crime branch arrest criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा