Pune Crime | सराईत तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे जिल्ह्यातून तडीपार (Tadipar) करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याला परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी डिसेंबर 2021 मध्ये पुणे जिल्ह्यातून (Pune Crime) दोन वर्षासाठी तडीपार केले होते. तडीपारीच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

वसिम उर्फ वच्छी गुलाम मोहम्मद शेख Wasim alias Vachchi Ghulam Mohammad Shaikh (वय – 32 रा. डीपी, लोहियानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अधिकारी, कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग (Patrolling) करत होते त्यावेळी तडीपार आरोपी वसिम उर्फ वच्छी शेख हा चुडामण तालीम चौकातील (Chudaman Talim Chowk) मदिना हॉटेल येथे जेवण करण्यासाठी आला असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीवर खडक पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला खडक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनावणे, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा