Pune Crime | तडीपार गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | खुनाचा प्रयत्न (Attempted murder), मारामारी, हत्यार बाळगणे (Weapon) यासारखे सात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात (Crime) तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगाराला (Tadipar Criminal) गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit One) पथकाने अटक (Arrest) केली आहे. गणेश बाळकृष्ण अडागळे Ganesh Balkrishna Adagale (वय – 36 रा. नानापेठ, राजेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) महाराष्ट्र पोलीस अधिनियम (Maharashtra Police Act) कलम 142 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

खुनाचा प्रयत्न, मारामारी, हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात तडीपार असलेल्या आरोपी गणेश अडागळे विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात 7 गुन्हे दाखल आहेत. आरोपी गणेश अडागळे हा नानापेठेत (Nana Peth) आईला भेटायला येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तडीपार असल्याचे सांगितले. तसेच तो कोणाची ही परवानगी न घेता शहरात आला होता. आरोपीविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीला पुढील कारवाईसाठी समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosale), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार इम्रान शेख, महेश बामगुडे, शुभम देसाई, निलेश साबळे यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा