Pune Crime | पुणे शहरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घरफोडी (Burglary) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा युनिट पाचने (Pune Police Crime Branch) बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडे केलेल्या चौकशीत 5 गुन्हे उघडकीस आले असून 1 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.21) केली. अमीर अजमाईन खान Amir Azmain Khan (वय-20 रा. तालाब मश्जिद जवळ, कोंढवा, पुणे) असे अटक (Arrest) केलेल्या (Pune Crime) आरोपीचे नाव आहे.

 

गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी व कर्मचारी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार अमीर खान याच्याकडे चोरीचे सोने असून त्याची विक्री करण्यासाठी जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कोंढवा परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड करुन 1 लाख 2 हजार 250 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने (Gold Jewellery), रोख रक्कम (Cash), मोबाईल जप्त केला.

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), महिला पोलीस उपनिरीक्षक चैताली गपाट (PSI Chaitali Gapat), पोलीस अंमलदार पृथ्वीराज पांडुळे, रमेश साबळे, विलास खंदारे, आश्रुबा मोराळे, शहाजी काळे, दया शेगर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal, 5 crimes were revealed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shivsena | खरी शिवसेना कुणाची? केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश

 

Pune Rape Case | धक्कादायक ! महाविद्यालयीन तरुणीला पळवून नेऊन बलात्कार; कर्वे रोडवरुन चाकणला नेऊन केला अत्याचार

 

Pune Crime | पती-पत्नीच्या वादात ‘डिलिव्हरी’ बॉयवर गुन्हा दाखल; जबरदस्तीने पार्सल देण्याचा केला प्रयत्न