Pune Crime | मावशीच्या मदतीने घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार क्राईम ब्रँचकडून गजाआड, 5 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर (Pune City Police) आणि परिसरात घरफोडी (Burglary In Pune) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपी मोहन देविदास बनसोडे (Mohan Devidas Bansode) याने त्याच्या मावशीच्या (Aunty) मदतीने घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 4 लाख 96 हजार 085 रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात गुन्हे उघडकीस (Pune Crime) आले आहे.

 

लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी मोहन देविदास बनसोडे (वय – 21 रा. लेन नं.7, पाटील इस्टेट, शिवाजीनगर – Patil Estate, Shivajinagar) हा पाटील इस्टेट येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट सहाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट पुलाच्या खाली सापळा रचून आरोपीला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर करुन त्याची 13 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी घेऊन पोलीस कस्टडीत (Police Custody) चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने त्याच्या मावशीच्या मदतीने पुणे शहर आणि परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले.(Pune Crime)

आरोपीकडून लोणीकंद, डेक्कन (Deccan Police Station), समर्थ (Samarth Police Station), सिंहगड रोड (Sinhagad Road Police Station), कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) दाखल असलेले 7 गुन्हे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील 4 लाख 96 हजार 085 रुपये किमीतीचे सोन्या – चांदीचे दागिने (Gold – Silver Jewelry) व रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितले की, काही दिवसांपूर्वी गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या मावशीचा इलेक्ट्रीक शॉक लागून मृत्यू झाला.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrest criminal for burglary with the help of aunt seizes Rs 5 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा