Pune Crime | सराईत वाहन चोराला गुन्हे शाखेकडून अटक, 9 दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहर आणि परिसरातून वाहन चोरी (Vehicle Theft) करणाऱ्या वाहन चोराला गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली. अटक (Arrest) करण्यात आलेला आरोपी सराईत गुन्हेगार असून पोलिसांनी (Pune Police) त्याच्याकडून 4 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 9 दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून (Pune Crime) चोरल्या आहेत.

 

समाधान गणपत जगताप Samadhan Ganpat Jagtap (वय-28 रा. गाडीतळ वस्ती, यवत, ता. दौंड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.12) लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीत केली. पुणे शहरामध्ये (Pune City) दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस वाहन चोरांचा शोध घेत होते. त्यावेळी माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार समाधान जगताप याच्याकडे नंबर नसलेली दुचाकी असून ती चोरीची आहे. (Pune Crime)

 

पथकाने मांजरी स्मशानभूमीजवळ सापळा रचून समाधान जगताप याला दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी (Inquiry) केली असता दुचाकी पुणे ग्रामीण (Pune Rural) मधील यवत पोलीस ठाण्याच्या (Yavat Police Station) हद्दीतून चोरल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे गुन्हे केल्याची माहिती मिळाली. आरोपीची 15 जुलै पर्यंत पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने 8 दुचाकी पोलिसांना काढून दिल्या.

आरोपी समाधान जगताप याने पुणे शहर व परिसरातील कोथरूड (Kothrud Police Station), चंदननगर (Chandannagar Police Station), लोणीकंद, लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), कोंढवा (Kondhwa Police Station), अलंकार (Alankar Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade Police Station) आणि यवत पोलीस स्टेशन मध्ये दाखल असलेले 9 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके (PSI Bhairavnath Shelke),
पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे,
प्रतिक लाहिगुडे, नितीन शिंदे, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे,
नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal In Vehicle Theft case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

CM Eknath Shinde | विधानसभेनंतर लोकसभेत शिवसेनेचे साम्राज्य हादरणार?

 

CM Eknath Shinde | पेट्रोल-डिझेलवरील दरात मोठी कपात, शिंदे-फडणवीस सरकारची घोषणा

 

Pune SPPU | पुणे विद्यापीठातील विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश; प्रशासनाने घेतली आंदोलनाची दखल