Pune Crime | सराईत गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड, 14 गुन्हे उघडकीस 20 लाखाचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) परिसरात घरफोडी (Burglary), चारचाकी वाहने (Four-Wheeler), दुचाकी वाहने चोरणाऱ्या (Two-Wheeler Thieves) सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 14 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 20 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि.23) हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत (Pune Crime) करण्यात आली.

 

अक्षयसिंग बिरुसिंग जुनी Akshay Singh Birusing Juni (वय-19 रा. बीराजदारनगर, वैदवाडी, हडपसर, पुणे) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट पाचचे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar) व पोलीस अंमलदार हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षसिंग जुनी याने पुणे शहर व ग्रामीण भागात (Rural Area) वाहन चोरी करुन त्याचा वापर घरफोडी चोरी करण्यासाठी करत असून त्याचेकडे चोरीचे वाहने असल्याची माहिती मिळाली. (Pune Crime)

 

त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अक्षयसिंग जुनी याला अक्टीवा दुचाकीसह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत त्याने व त्याच्या साथिदारांनी वाहन चोरी करुन त्याचा वापर घरफोडी करण्यासाठी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून चारचाकी 4, दुचाकी 6 असे एकूण 10 वाहने जप्त केली. तसेच 5 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपीकडून 19 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

आरोपीने वानवडी Wanwadi Police Station, बंडगार्डन (Bund Garden Police Station), हडपसर, इंदापुर (Indapur Police Station), लोणी काळभोर (Loni Kalbhor Police Station), मुंढवा (Mundhwa Police Station), लष्कर (Lashkar Police Station), मार्केटयार्ड (Market Yard Police Station), चिंचवड पोलीस ठाण्याच्या (Chinchwad Police Station) हद्दीत गुन्हे केले आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil),
सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस अंमलदार अकबर शेख, विनोद शिवले, प्रमोद टिळेकर,
पांडुरंग कांबळे, रमेश साबळे, चेतन चव्हाण, अजय गायकवाड यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal, open 14 crimes, 20 lakhs seized hadapsar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Amol Mitkari | ‘आमदार झाल्यावर मी हवेत होतो, त्यानंतर…’, राष्ट्रवादीच्या आमदाराची थेट कबुली

 

Pune Fire News | सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दुकानांना भीषण आग; तीन दुकाने आगीत भस्मसात

 

Eknath Shinde | उद्धव ठाकरेंनी झेड सुरक्षा नाकारली का? शंभुराजे देसाईंच्या दाव्यावर CM एकनाथ शिंदे म्हणाले…