Pune Crime | चुलत भावाला जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | भांडणाचा (Dispute) राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने चुलत भावावर (Cousin) धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. या गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट एकच्या (Crime Branch Unit 1) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली आहे. अतुल विलास कोळपे Atul Vilas Kolpe (वय- 21) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी (Pune Crime) फरार होता.

अजित कोळपे (Ajit Kolpe) आणि त्याचे चुलत भाऊ ओंकार कोळपे (Omkar Kolpe) आणि अनिल कोळपे (Anil Kolpe) यांच्यात भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन ओंकार कोळपे याने 22 मे रोजी साथिदारांच्या मदतीने अजित याच्यावर धारदार हत्याराने डोक्यात वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार कात्रज गुजरवाडी फाटा येथे घडला होता. याबाबत अजित याचे वडिल शंकर कोळपे (Shankar Kolpe) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध IPC 307, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी अतुल कोळपे हा नाना पेठेत (Nana Peth) आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. (Pune Crime)

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदिप भोसले (Police Inspector Sandeep Bhosale), पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार अमोर पवार, अजय थोरात, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, महेश बामगुडे, तुषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal Who Abscond In Attempt To Murder Case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री?
राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही;
आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा
आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल –
विक्रम कुमार, महापालिका आयुक्त