Pune Crime | पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल (Pistol) आणि एक जिवंत काडतुस (Cartridge) जप्त केली आहेत. पोलिसांनी (Pune Police) ही कारवाई मंगळवारी (दि.29) स्वारगेट परिसरातील पुरंदर कॉम्प्लेक्स (Pune Crime) येथे केली.

 

हेमंत उर्फ बबलु प्रताप धुमाळ Hemant alias Bablu Pratap Dhumal (वय-26 रा. सांगवी, ता. बारामती) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस स्वारगेट पोलीस ठाण्याच्या (Swargate Police Station) हद्दीत पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, स्वारगेट येथील पुरंदर कॉम्प्लेक्स जवळ असलेल्या कॅनल जवळ एकजण थांबला असून त्याच्याकडे पिस्टल आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून धुमाळ याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता 40 हजार 200 रुपयांचे एक पिस्टल आणि एक काडतुस जप्त करण्यात आले. (Pune Crime)

 

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी (Robbery), दरोडा व मोक्का (MCOCA Action) Mokka या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी विरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील (Police Inspector Krantikumar Patil), सहायक पोलीस निरीक्षक वैशाली भोसले (API Vaishali Bhosle), पोलीस उपनिरीक्षक नितीन कांबळे (PSI Nitin Kamble), पोलीस अंमलदार नामदेव रेणुसे, शंकर नेवसे, साधना ताम्हाणे, विजयकुमार पवार, गणेश थोरात, गजानन सोनुने, नागनाथ राख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch Arrest Criminal Who Carry Pistol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला गुन्हे शाखेकडून अटक

 

Maharashtra Government Formation | अखेर ठरलं ! देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा शपथविधी आजच संध्याकाळी होणार

 

RBI पॉलिसीने तुटू शकते शेअर मार्केटचे ’सुरक्षा जाळे’, रिटेल गुंतवणुकदार जाऊ शकतात शेअर बाजारापासून दूर