Pune Crime | अनेकांना गंडा घालणाऱ्या तोतया पोलिसाला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | अंगात पोलिसांचा गणवेश, त्यावर जर्किंन घालून लोकांना पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणाऱ्या तोतया पोलिसाच्या पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या (Pune Police Crime Branch Unit Four) पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने पोलीस असल्याची बतावणी करुन अनेकांना गंडा घातला असल्याचा संशय पोलिसांना (Pune Crime) आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला होता.

प्रमोद बाळू ढेरे (Pramod Balu Dhere)  (वय-30 रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी ही कारवाई इराणी मार्केटजवळ केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक चारचाकी गाडी, पोलीस वापरत असलेल्या शिट्ट्या, लाठी असा एकूण 5 लाख 90 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime)

पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी युनिट चारचे पथक येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पथकाला माहिती मिळाली की, प्रमोद ढेरे हा स्विफ्ट गाडी (एमएच 12 एलजे 0418) सह इराणी मार्केट जवळ आला आहे. त्याने पोलिसांच्या सारखे केस कापलेले आहेत. यावरुन पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या गाडीवर POLICE असे लाल अक्षरात लिहीलेले होते. त्यावर पोलिसांचा मोनोग्राम लावला होता. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता पोलीस वापरतात तश्या शिट्ट्या व लाठी आढळून आल्या.

आरोपीकडे केलेल्या चौकशीत तो 12वी पास आहे. मात्र तो कोणत्याही कारणाशिवाय पोलीस ठाणे, कोर्टात जात होता.
याठिकाणी फिरुन पोलिसांची कार्यपद्धती, त्यांचे चालणे-बोलणे, राहणीमान याचा अभ्यास करत होता.
त्यानुसार तो राहुन लोकांची पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील कार्यवाहीसाठी आरोपीला येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP  Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
(Joint CP  Sandeep Karnik) ,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Crime Ramnath Pokle), पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे (DCP Crime Amol Zende),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar), पोलीस निरीक्षक गणेश माने (PSI ganesh Mane) यांच्या
मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र पवार, पोलीस अंमलदार नागेशसिंग कँवर, रमेश राठोड,
मनोज सांगळे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminal Who cheat with lot of peoples

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Udayanraje Bhosale | राज्यपालांना अडीच वर्षात शिवाजी महाराज समजले नाहीत, त्यांना तात्काळ पदमुक्त करा; उदयनराजेंची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

BJP Vs Congress In Maharashtra | भाजपच्या दोन दिग्गजांमध्ये बेबनाव…, काँग्रेस नेत्याचं विधान