Pune Crime | जखमी झालेल्या दुचाकीस्वाराला मदत करण्याऐवजी पळविला मोबाईल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | मोटारसायकल घसरुन चालक खाली पडून जखमी झाला असताना त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने चोरुन नेण्याचा प्रकार समोर (Pune Crime) आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने (Pune Police Crime Branch) एका चोरट्याला अटक केली आहे.
ईश्वर दगडु भडकवाड (रा. जय मल्हार अपार्टमेंट, दांडेकर पुल) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
हा प्रकार सातारा रोडवरील स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता घडला होता.

याप्रकरणी सागर नवघने (वय ३१, रा. श्रीनगर सोसायटी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिसांकडे (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे.
सागर नवघने हे मोटारसायकलवरुन जात असताना १० जून रोजी सायंकाळी त्यांची मोटारसायकल घसरुन ते पडले होते. ते पडलेले पाहून काही जण धावून आले.
त्यात ईश्वर भडकवाड याने ते खाली पडल्याचे पाहून त्याचा गैरफायदा घेऊन त्यांचा १५ हजार रुपयांचा मोबाईल हिसका मारुन चोरुन नेला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने आता ईश्वर भडकवाड याला पकडले.
त्याच्याकडे काही चोरीचे मोबाईल आढळून आले. त्या मोबाईल मालकाचा शोध घेत असताना हा प्रकार उघडकीस आला आहे.

 

Web Title : pune crime | pune police crime branch arrest criminal

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Awas | पीएम आवास योजनेबाबत तुम्हाला सुद्धा असेल काही अडचण तर ‘इथं’ करा तक्रार; ‘इतक्या’ दिवसात निघेल मार्ग

GST कौन्सिलने ‘या’ वस्तूंच्या दरात केला बदल, तपासून पहा संपूर्ण यादी

MEDICINE ATM | खुशखबर ! आता ATM मधून बाहेर पडतील औषधे, प्रत्येक तालुक्यात लावणार मशिन्स, जाणून घ्या मोदी सरकारचा पूर्ण प्लान