Pune Crime | सराईत वाहनचोराला गुन्हे शाखेकडून अटक, दोन दुचाकी जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरात वाहन चोरीचे (Vehicle Theft) गुन्हे वाढत असल्याने पुणे गुन्हे शाखा युनिट एकच्या (Pune Police Crime Branch) पथकाकडून हद्दीत पेट्रोलिंग (Patrolling) करुन रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत असताना एका सराईत वाहन चोराला अटक (Arrest) केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) शनिवार पेठेतील (Shaniwar Peth) ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज मठाजवळील (Brahmachaitanya Gondavalekar Maharaj Math) रोडवर करण्यात आली.

 

मयुरेश अनंत डेरे Mayuresh Anant Dere (वय-33 रा. डेरेवाडा, 240 कसबा पेठ Kasba Peth, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी मयुरेश डेरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरातील (Pune Crime) पोलीस ठाण्यात घरफोडीचे (Burglary) गुन्हे दाखल आहेत.

 

गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस पेट्रोलींग करत असताना, रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार (Pune Criminals) मयुरेश डेरे हा चोरीची सुझुकी अ‍ॅक्सेस मोपेड (Suzuki Access Moped) घेऊन शनिवार पेठेत येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दोन दुचाकी जप्त करुन फरासखाना (Faraskhana Police Station) आणि डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार शशीकांत दरेकर, राहुल मखरे,
अशोक माने, अनिकेत बाबर, दत्ता सोनावणे, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर, महेश बामगुडे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tax Saving Tips | इन्कम टॅक्स Rebate मिळवण्यासाठी 80C ची मर्यादा संपल्यानंतर सुद्धा घेऊ शकता 1 लाखापर्यंत सवलतीचा लाभ, ‘ही’ आहे प्रक्रिया

 

Pune Crime | दुचाकी आणि अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्ट्या चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला खडक पोलिसांकडून अटक; 2 लाखाचा मुद्दमाल जप्त

 

Hair Care Tips | केस कोरडे आणि निर्जीव होण्यापासून वाचवण्यासाठी अवलंबा ‘या’ 4 टिप्स; जाणून घ्या