Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज उकळणारा खासगी सावकार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | दरमहा 10 टक्के व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करुन धमकाविणाऱ्या खासगी सावकाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. रमजान मोहंमद खान Ramzan Mohammad Khan (वय 40, रा. शेलार चाळ, येरवडा) असे या सावकाराचे (Pune Crime) नाव आहे.

 

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील फक्त आणि फक्त क्राईमच्या बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

याप्रकरणी विनोद सिद्राम बुधाराम Vinod Sidram Budharam (वय 43, रा. विडी कामगार वसाहत, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रमजान शेख याच्यावर आयपीसी 385, 504 व महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत (Maharashtra Lenders Act) गुन्हा (FIR) दाखल दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बुधाराम यांनी रमजान खान याच्याकडून ऑगस्ट 2021 मध्ये 50 हजार रुपये व डिसेंबरमध्ये 1 लाख रुपये असे मिळून 1 लाख 50 हजार रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने (Interest) घेतले होते. त्याच्या बदल्यात त्यांनी मुद्दल व व्याज मिळून एप्रिल 2022 पर्यंत एकूण 2 लाख 12 हजार 250 रुपये परत केले. असे असतानाही फिर्यादी यांना त्याने फोन करुन शिवीगाळ केली. त्यांच्याकडे 10 हजार 400 रुपयांची मागणी केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर) भाग्यश्री नवटके (DCP Bhagyashree Navatke) अतिरिक्त कार्यभार अपर पोलीस आयुक्त,
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे,
प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव,
चेतन शिरोळकर, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Private moneylender of Yerwada Area, who charge 10 per cent interest per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pankaja Munde | ‘पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’ ! विधानपरिषदेसाठी भाजपने पत्ता कट केल्यानंतर शिवसेना नेत्यांकडून आमंत्रण

Shambhuraj Desai | बेशिस्त, बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करा; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

 

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले – ‘पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं, खडसेंचंही तेच झालं; याचा परिणाम… ‘