Pune Crime | रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करून कॉलेज विद्यार्थ्याची फसवणूक; भामटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करुन कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची (College Student) आर्थिक फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch Unit 3) पथकाने अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime) गुरुवारी (दि.15) दुपारी अडीचच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) शेवटचा बस स्टॉप येथे करण्यात आली.

शुभम अशोक माने Shubham Ashok Mane (वय-22 रा. भवानी पार्क बिल्डींग, मंदार सोसायटी, धनकवडी सध्या रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शुभम माने याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) आयपीसी 420, 170, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सिहंगड पोलीस आणि युनिट तीनच्या पथकाकडून करण्यात येत होता. (Pune Crime)

आरोपीने कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपण सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) असल्याचे सांगितले. रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? अशी विद्यार्थ्याला धमकी (Threat) देऊन त्याच्याकडून पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केली. गुन्ह्याचा तपास करत असताना युनिट तीनच्या पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या ज्युपिटर गाडीचा (एमएच 12 एनएस 1871) क्रमांक पोलिसांनी मिळाला.

पोलिसांनी गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाच्या घराचा पत्ता शोधला. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस जात असताना आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरुन जात असल्याचे आढळून आले. धनकवडी शेवटच्या बस स्टॉपजवळ पोलिसांनी त्यांची गाडी आडवी घालून आरोपीला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर (ASI Santosh Kshirsagar)
पोलीस अंमलदार रामदास गोणते, शरद वाकसे, सुजित पवार, संजीव कळंबे, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते,
प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Shubham Ashok Mane Who Cheat College Students sinhagad raod police station case

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Irrigation Department On Khadakwasla Dam | खडवासला धरणात सांडपाणी न मिसळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सर्वंकष आराखडा

Narayan Rane On Sharad Pawar | गप्प बसा, राज्य सांभाळायला आम्ही…, शरद पवार यांना नारायण राणेंचे प्रत्युत्तर!

Anil Bonde On Love Jihad | लव्ह जिहाद’वरून भाजपा खासदार अनिल बोंडे यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘मी संसदेत लवकरच…’

Pune PMC News | वापरच होत नसल्याने अर्बन स्ट्रीट डिझाईनमधून सायकल ट्रॅक वगळण्यासाठी महापालिकेच्या हालचाली