Pune Crime | पुण्यात वृद्ध महिलेचा गळा दाबून जबरदस्तीने दागिने चोरणाऱ्या महिलेला गुन्हे शाखेने रंगेहात पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वयस्कर महिलेचा गळा दाबून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने (Gold jewelry) चोरण्याचा (Theft) प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला गुन्हे शाखा (Pune Crime)  युनिट 6 च्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. पुणे गुन्हे शाखा (Pune Crime Branch) युनिट 6 च्या पथकाने ही कारवाई जेजुरी पोलीस ठाण्याच्या (Jejuri Police Station) हद्दीतील कोळविहीरे येथे केली. गौरी उर्फ तनिष्का मुकुंद कुंभार (वय-19 रा. मु.पो. कोळविहीरे, ता. पुरंदर सध्या रा. हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

 

गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक नितीन मुंढे (Nitin Mundhe) यांना तनिष्का कुंभार ही महिला तिच्या गावातील अलका दत्तात्रय नेवासकर (वय-60) या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने कोळविहिरे गावात जाऊन संशयित महिलेच्या हालचालीवर पाळत ठेवली. त्यावेळी तनिष्का कुंभार ही एका घरात जाताना दिसली.

 

काहीवेळाने एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज आल्याने पोलिसांनी तात्काळ (Pune Police Crime Branch) घराच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी आरोपी महिला वयस्कर महिलेचा (old woman) गळा दाबून तिला मारहाण करत असल्याचे दिसून आले. आरोपी जबरदस्तीने वयस्कर महिलेच्या गळ्यातील दागने चोरण्याचा प्रयत्न (Pune Crime) करताना रंगेहात पकडले. तनिष्का कुंभार हिच्या विरोधात जेजुरी पोलीस ठाण्यात(Jejuri Police Station) गुन्हा (FIR) दाखल करुन पुढील तपासासाठी जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addi CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले (PSI Sudhir Tengle),
अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे,
प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर,
शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | pune police crime branch arrest woman who looted senior citizen woman

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Sitaram Kunte | ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ वाढवला

PMC Bank चे USFB मध्ये होणार विलीनीकरण, ‘पीएमसी’च्या ग्राहकांना 10 वर्षात मिळणार पूर्ण पैसे

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 768 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Corporation | ATM System मधील कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराची ED कडे तक्रार करण्याची गर्जना करणारे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रस्ताव मंजुरीच्यावेळी सभागृहातून ‘गायब’ ! राष्ट्रवादी कॉंग्रेसने ‘युटर्न’ घेत दिली भाजपला साथ