Pune Crime | घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या, 30 घरफोडीचे गुन्हे उघड, 32 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील (Pune Crime) विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी (Burglary In Pune) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Criminals) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. आरोपीने पुणे शहरात 30 घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 31 लाख 72 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.(Pune Crime)

अर्जुनसिंग रजपुतसिंग दुधानी Arjun Singh Rajput Singh Dudhani (वय-44 रा. 72 वस्ती, पाण्याच्या टाकीजवळ, मांजरी बुद्रूक, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या (Loni Kalbhor Police Station) हद्दीत झालेल्या घरफोडीचा तपास युनिट सहाच्या पथकाकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा सराईत गुन्हेगार अर्जुनसिंग दुधानी याने त्याच्या साथिदारासह केल्याची माहिती मिळाली.
तसेच दुधानी हा हडपसर (Hadapsar) येथील रामटेकडी येथे येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली.
आरोपीची पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून एक चारचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 610 ग्रॅम वजनाचे दागिने (Jewelry), 780 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने (Silver Jewelry), 55 हजार रुपये रोख, सॅन्ट्रो कार असा एकूण 31 लाख 72 हजार 860 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Pune Crime)

आरोपीने चतु:श्रुंगी (Chaturshrungi Police Station), येरवडा (Yerawada Police Station),
विश्रांतवाडी (Vishrantwadi Police Station), लष्कर (Lashkar Police Station), सिंहगड (Sinhagad Police Station),
अलंकार (Alankar Police Station), स्वारगेट (Swargate Police Station), मुंढवा (Mundhwa Police Station), लोणीकंद(Lonikanda Police Station), लोणी काळभोर, वानवडी (Wanwadi Police Station),
हडपसर (Hadapsar Police Station), कोंढवा पोलीस ठाण्याच्या (Kondhwa Police Station) हद्दीत घरफोडी आणि वाहन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले (PSI Sudhir Tengle), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

 

Web Title :-  Pune Crime | Pune Police Crime Branch Arrested burglars 30 burglary cases solve Rs 32 lakh seized

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | RTI कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला मोक्काच्या गुन्ह्यात 11 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी, चतुःश्रृंगी पोलिसांनी केली होती अटक

 

Tax Saving | 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 1 रुपयाचाही भरावा लागणार नाही टॅक्स, जाणून घ्या काय करावे

 

Blood Sugar | मधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘हे’ पदार्थ अत्यंत ‘घातक’, जाणून घ्या खाण्याच्या कोणत्या गोष्टींपासून रहावं दूर