Pune Crime | खुनाच्या गुन्ह्यातून 8 वर्षांनी निर्दोष सुटला, स्वसंरक्षणार्थ पिस्टल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | कुख्यात गुंड पप्पू तावरे खून प्रकरणात (Pappu Taware Murder Case) मागील आठ वर्षापासून येरवडा जेलमध्ये (Yerawada Jail) असलेल्या आरोपीची एक महिन्यापूर्वी निर्दोष मुक्तता करण्यात आली. जेलबाहेर आल्यानंतर स्वसंरक्षणार्थ विनापरवाना पिस्टल (Pistol) बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने (Pune Police Crime Branch) अटक (Arrest) केली. ही कारवाई शनिवारी (दि.29) पुण्यातील (Pune Crime) धायरी (Dhayari) येथील पासोडी परिसरात केली. ज्ञानेश्वर उर्फ माऊली पांडुरंग तावरे Dnyaneshwar alias Mauli Pandurang Taware (वय-31 रा. मु. जांबळी पो. सांगरुन ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

पुणे ग्रामीण पोलिसांच्या (Pune Rural Police) हवेली पोलीस ठाण्याच्या (Haveli Police Station) हद्दीत 8 वर्षापूर्वी कुख्यात गुंड पप्पु तावरे याचा जांभळी गावात रुपेश तावरे (Rupesh Taware), माऊली तावरे व गजा मारणे टोळीतील (Gaja Marne Gang) 7 ते 8 जणांनी मिळून टोळीच्या वर्चस्वाच्या कारणावरुन गोळ्या झाडून (Firing) आणि कोयत्याने वार करुन खून केला होता. या गुन्ह्यात सर्व आरोपींना अटक झाली होती. त्यामध्ये सर्वजण जामिनावर बाहेर आले होते. मात्र माऊली तावरे याला जामीन मिळाला नव्हता. एक महिन्यापूर्वी आरोपींना निर्दोष सोडल्याने येरवडा जेलमध्ये असलेल्या माऊली तावरे याला देखील सोडण्यात आले होते. (Pune Crime)

माऊली तावरे याने तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विरोधी टोळीकडून जिवाला धोका असल्याच्या भितीने पिस्टल बाळगले असून तो धायरी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे (Datta Sonawane) यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने धायरी येथील एका मोकळ्या जागेत आरोपीला सापळा रचून ताब्यात घेतले.
त्याची अंगझडती घेतली असता 62 हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल मिळाले.
तसेच मॅगझीनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे (Senior Police Inspector Shailesh Sankhe),
पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड (PSI Sanjay Gaikwad), सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni), पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर, राहुल मखरे, अशोक माने, शशिकांत दरेकर, विजयसिंग वसावे, रुक्साना नदाफ यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch arrested criminal who carrying pistol

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा