Pune Crime | पुण्यात अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला गुन्हे शाखेकडून अटक, 20 लाखाचे मेफेड्रॉन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | मेफेड्रॉन Mephedrone (एमडी) हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने (Anti Narcotics Cell, Pune) आसाम (Assam) येथील व्यक्तीला अटक केली आहे. आरोपीकडून 20 लाख 52 हजार रुपये किमतीचे 171 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी) जप्त करण्यात आले आहे. राहुल हितेश्वर नाथ Rahul Hiteshwar Nath (रा.शिवनेरीनगर गल्ली, कोंढवा खुर्द) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी (Pune Police) आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) एन. डी. पी. एस. अ‍ॅक्ट (N. D. P. S. Act) कायद्यानुसार गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना अंमली पदार्थ विरोधी पथक दोनच्या पोलिसांना माहिती मिळाली की, शिवनेरीनगर (Shivnerinagar) गल्ली नं. 23 येथे आसाम राज्यातील एक व्यक्ती अंमली पदार्थ विक्रीसाठी (Pune Crime) येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथील सार्वजनिक रोडवर सापळा रचला. त्यावेळी राहुल नाथ हा व्हेस्पा मोपेड वरुन संशयित रित्या जाताना आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 20 लाख 52 हजार रुपये किमतीचे 171 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याच्याकडून 21 लाख 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार आझीम शेख (Azim Shaikh) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

ही कारवाई आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे – 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर (Police Inspector Prakash Khandekar), पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan), पोलीस देशपांडे, बोमादंडी, रोकडे, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड व महिला पोलीस अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrested Drug smuggler 20 lakh mephedrone seized

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा