Pune Crime | पुण्यात गांजा विक्रीसाठी आलेल्या कोल्हापूरच्या दोघांना अटक; 50 किलो गांजासह 18 लाखांचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | गांजा (Cannabis) विक्रीसाठी पुण्यात आलेल्या कोल्हापूरातील (Kolhapur) दोघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell, Pune) कात्रज (Katraj) परिसरातून अटक (Arrest) केली. महेश श्रीपती पाटील Mahesh Shripati Patil (वय ३९, रा. पोलीस मळा, मु. पो. सरवडे, जि. कोल्हापूर, सध्या रा. मिरज, सांगली) आणि ओंकार रवींद्र सुतार Omkar Ravindra Sutar (वय २४, रा. सरवडे, राधानगरी, कोल्हापूर) अशी अटक (Pune Crime) केलेल्यांची नावे आहेत.

 

त्यांच्याकडून १० लाख १२ हजार रुपयांचा ५० किलो गांजा व एक चारचाकी गाडी असा १८ लाख २५ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

 

याप्रकरणी पोलीस हवालदार संदिप सोनबा जाधव (Police Sandeep Sonba Jadhav) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४९/२२) दिली आहे. पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) हे सहकार्‍यांसह भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थाच्या अनुषंगाने मध्यरात्री गस्त घालत होते. त्यावेळी पथकाला कात्रज परिसरातील रॉयल पंजाब रेस्टोरंन्ट बार (Royal Punjab Restaurant Bar) समोरील सार्वजनिक रोडवर ईरटिगा कार थांबली असल्याचे दिसले. त्यांची आणि साध्या वेशातील पोलीस यांची नजरानजर होताच ते गडबडून गेले. एकमेकांशी कुजबुज करु लागले. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना थांबवून चौकशी केली. (Pune Crime)

तेव्हा त्यांनी तुम्ही पोलीस असल्याचे आम्ही ओळखले आणि आम्ही पकडले जाऊ, या भितीने घाबरलो, असे त्यांनी सांगितले.
त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली.
त्यात डिकीमध्ये दोन पोत्यांमध्ये १० लाख १२ हजार ४०० रुपयांचा ५० किलो ६२० ग्रॅम गांजा,
५ हजार ५०० रुपये रोख, तीन मोबाईल व इरटिगा गाडी असा १८ लाख २५ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch Arrested Two from Kolhapur for
selling cannabis; Goods worth Rs 18 lakh seized along with 50 kg of cannabis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा