Pune Crime | बसमधील प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक, पाच गुन्हे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पीएमटी आणि पीएमपीएमएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. आरोपींकडून पाच गुन्ह्यातील 96 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई (Pune Crime) बुधवार चौकाजवळ असलेल्या बस स्टॉपवर सापळा रचून केली.

 

अविनाश उर्फ चार्ली सिद्राम जाधव (वय-32 रा. जनसेवा बँकेजवळ, केशवनगर, मुंढवा, पुणे), आदर्श नारायण गायकवाड (वय-31 रा. महादेव मंदीराजवळ, मुंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणारे दोन जण बुधवार चौकाजवळील बस स्टॉपवर येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पथकाला मिळाली. पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. (Pune Crime)

 

आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मागील एक वर्षात बस स्टॉपवर व बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी शिवाजी रोड, भापकर पेट्रोल पंप ते सातारा रोड, नऱ्हे ते हुजुरपागा, कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, आळंदी ते विश्रांतवाडी, काळेवाडी ते विद्यापीठ, पुणे स्टेशन ते वाघोली या मार्गावर प्रवाशांना लुटल्याची कबुली दिली. आरोपींकडून फरासखाना, खडक, सहकारनगर, येरवडा, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींना फरसाखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -1 गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भोसले,
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, अजय जाधव,
पोलीस अंमलदार राहुल माखरे, अनिकते बाबर, शशिकांत दरेकर, अभिनव लडकत, दत्ता सोनावणे,
महेश बामगुडे, विठ्ठल साळुंखे, तषार माळवदकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime branch arrested two people who robbed bus passengers, five crimes were revealed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Devendra Fadnavis | शरद पवार बोलल्यावर उद्धव ठाकरेंना बोलावेच लागते – देवेंद्र फडणवीस

Prakash Ambedkar | राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र येणार?, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान

Sharad Pawar On Shinde-Fadnavis Govt | शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार का? शरद पवारांनी दिले उत्तर; म्हणाले – ‘मी काही ज्योतिषी नाही’