Pune Crime | गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | बेकायदेशीर गांजा (Marijuana) बाळगून त्याची विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell, Pune) अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 20 हजार रुपये किमतीचा दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई (Pune Crime) वानवडी गावातील विठ्ठलराव शिवरकर रोडवर केली.

 

सोहेल मोदीन आसंगी Sohail Modin Asangi (वय – 21 रा. हेमी गार्डन सोसायटी, दत्तनगर, जांभुळवाडी, कात्रज – Katraj), सोनी रविंद्र हिरे Soni Ravindra Hire (वय – 21 रा शनीनगर, जांभुळवाडी रोड कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस हवालदार प्रशांत शितोळे (Police Constable Prashant Shitole) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

खंडणी विरोधी पथक दोनचे सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajagane) हे पथकासह वानवडी पोलीस ठाण्याच्या (Wanwadi Police Station) हद्दीत पेट्रोलींग करत असताना वानवडी गावातील विठ्ठलराव शिवरकर रोडवर दोन जण दुचाकीवर थांबल्याचे आढळून आले. त्यांचा संशय आल्याने त्यांच्याकडे असलेल्या अ‍ॅक्टीव्हा गाडीच्या डीकीची तपासणी केली. त्यावेळी डिकीमध्ये 20 हजार रुपये किमतीचा गांजा आढळून आला. आरोपींकडून गांजा, दुचाकी, मोबाईल असा एकूण 65 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस अ‍ॅक्टनुसार (NDPS Act) गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare), सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan), मोहनदास जाधव (PSI Mohandas Jadhav) पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव, चेतन शिरोळकर, चेतन आपटे, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : –  Pune Crime | Pune Police Crime branch arrested two people who were selling ganja

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा