Pune Crime | निलेश घायवळ टोळीमधील मोक्यातील आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुण्यातील निलेश घायवळ टोळीमधील (Nilesh Ghaiwal Gang) मोक्का (MCOCA Action) Mokka गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch) पथकाने सापळा रचून अटक (Arrest) केली आहे. समीर बाळु खेंगरे (Sameer Balu Khengare) असे अटक करण्यात (Pune Crime) आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) खूनाचा प्रयत्न (Attempted murder), आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल असून या गुन्ह्यात पोलीस त्याचा शोध घेत होते. (Pune Criminals)

 

गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस अधिकारी (Pune Police) आणि कर्मचारी कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार यांना माहिती मिळाली की, कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी समीर बाळु खेंगरे (वय – 24 रा. संत ज्ञानेश्वर कॉलनी, कोथरुड) हा शितल हॉटेल समोरील कर्वेपुतळा (Curve Statue) येथे येणार आहे. मिळाळेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात (Pune Crime) घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील तपासासाठी आरोपीला सहायक पोलीस आयुक्त कोथरुड विभाग (Kothrud Division ACP) यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More), पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पवार (PSI Tejaswi Pawar), पोलीस अंमलदार महेश निंबाळकर, संतोष क्षिरसागर, राजेंद्र मारणे, रामदास गोणते, संजीव कांबळे, राकेश टेकावडे, दिपक क्षिरसागर, ज्ञानेश्वर चित्ते, प्रकाश कट्टे, सतिश कत्राळे, प्रताप पडवाळ, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, चालक सुजीत पवार यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests accused in Nilesh Ghaiwal gang

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा