Pune Crime | घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | फुरसुंगी परिसरात (Fursungi) 4 मे रोजी एकाच रात्री सलग तीन दुकाने फोडून दुकानात चोरी (Theft In Shop At Fursungi) करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (Pune Criminals) गुन्हे शाखा युनिट पाचच्या (Pune Police Crime Branch) पोलिसांनी (Pune Police) बेड्या ठोकल्या आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी (Ajay Singh Arjun Singh Dudhani) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून वाहन चोरी (Vehicle Theft), घरफोडीचे (Burglary) 7 गुन्हे उघडकीस आले असून 6 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Pune Crime) केला आहे.

फुरसुंगी परिसरात झालेल्या घरफोडीचा तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी घटनास्थळापासून 15 किमी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान पथकातील पोलीस अंमलदार यांना अजयसिंग दुधानी (वय-20 रा. भापकर वस्ती, मांजरी बुद्रुक-Manjari Budruk) याने चोरी केल्याची माहिती समजली. पथकाने सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी चोरीची गाडी व त्यामधील घरफोडीचे साहित्य घेऊन पळून जाऊ लागला. पथकाने पाठलाग करुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या.(Pune Crime)

File photo

 

आरोपीकडे सखोल चौकशी केली असता मौजमजा करण्यासाठी पैसे लागत असल्याने त्याने व त्याच्या साथीदाराने लोणी काळभोर येथून मारुती इको कार (Maruti Eeco Car) चोरल्याची माहिती दिली. तसेच या गाडीचा वापर करुन कोंढवा (Kondhwa Police Station), हडपसर (Hadapsar Police Station), लोणी-काळभोर (Loni-Kalbhor Police Station), यवत पोलीस स्टेशनच्या (Yavat Police Station) हद्दीत घरफोडी व वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली इको कार, अ‍ॅक्टीव्हा, सोने-चांदीचे दागिने (Gold-Silver Jewelry) असा एकूण 6 लाख 42 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील (Police Inspector Hemant Patil), सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), पोलीस अंमलदार विनोद शिवले, अकबर शेख, प्रमोद टिळेकर, रमेश साबळे, दया शेगर, दाऊद सय्यद, प्रविण काळभोर, आश्रुबा मोराळे, चेतन चव्हाण, स्वाती गावडे यांच्या पथकाने केली.

Web Title : Pune Crime | Pune Police Crime Branch arrests burglar, seizes Rs 6 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त