Pune Crime | चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये वाहन चोरी (Vehicle Theft) करुन त्याची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सराईत वाहन चोराला गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch) दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने (Anti-Robbery and Anti-Vehicle Theft Squad) सापळा रचून अटक (Arrest) केली. रोहन उर्फ लोकेश दत्ता धावडे Rohan alias Lokesh Datta Dhavade (वय-27 रा. पर्वती दर्शन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे (Pune Crime) नाव आहे.

 

दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई हडपसर (Hadapsar) येथील गाडीतळ परिसरात (Gadital) केली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहे. पुणे शहरात वाहन चोरींच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुन्हे शाखेचे दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथक हडपसर पोलीस ठाण्याच्या (Hadapsar Police Station) हद्दीत गस्त घालत असताना गाडीतळ परिसरात एकजण थांबला असून त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची माहिती पथकाला मिळाली.

 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने गाडीतळ परिसरात सापळा रचून आरोपी धावडे याला ताब्यात घेतले.
त्याच्याकेड असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने पुणे शहरातील हडपसर, विश्रांतवाडी (Vishrantwadi) तसेच सातारा जिल्ह्यातील (Satara District) शिरवळ (Shirwal) भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर (Police Inspector Sunil Pandharkar), उपनिरीक्षक गुंगा जगताप (PSI Gunga Jagtap), उदय काळभोर, सुदेश सकपाळ, दत्तात्रय खरपुडे, शिवाजी जाधव यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal for selling stolen bike

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ola Electric Car | Ola च्या पहिल्या इलेक्ट्रिक कारचा टीजर व्हिडिओ जारी, दमदार आहे तिचा फ्यूचरिस्टिक लुक

 

India Post Payments Bank-IPPB च्या खातेधारकांसाठी वाईट बातमी ! RuPay व्हर्चुअल डेबिट कार्ड असणार्‍यांना भरावा लागेल नवीन चार्ज

 

Pune Crime | वाढदिवसाच्या दिवशी हॉटेल मालक, बाऊंसरने धुतले ! दोघांचा वाढदिवस एक केक वादातून बाणेर येथील हॉटेलमध्ये भांडणे