Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक, अग्नीशस्त्र जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला (criminal) पुणे गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे (Cartridges) जप्त केली आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीत मंगळवारी (दि.7) केली.

समीर प्रकाश कोतवाल (वय-34 रा. वॉचमेकर चाळ, भवानी पेठ पुणे) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस नाईक बाळासाहेब सकटे (Balasaheb Sakte) यांना माहिती मिळाली की, भवानी पेठेतील एका व्यक्तीने चोरी करण्यासाठी पिस्टल आणले आहे. (Pune Crime)

पोलिसांनी भवानी पेठेतील वॉचमेकर चाळीत सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक देशी बनावटीचे पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त चौकशी केली असता रॉबरी करण्यासाठी पिस्टल आणल्याची कबुली आरोपीने देली. आरोपी विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) आर्म अॅक्ट (Arm Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve), अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge), सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane), सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले (PSI Sudhir Tengle), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Web title : Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal, seizes firearms

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | कुबेर शक्ती मल्टी पर्पज इंडिया निधी लिमीटेडकडून 100 जणांची फसवणूक; पुणे पोलिसांकडून शिरीष खरात याला नाशिकहून अटक

PM Kisan | ‘या’ शेतकर्‍यांना मिळणार नाहीत 10 व्या हप्त्याचे 2000 रुपये, जाणून घ्या सरकारचे नवीन नियम

Gold Silver Price Today | सोन्याच्या भावात घसरण तर चांदी वधारली; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | कात्रज परिसरातील 4 सोसायटयांमधील फ्लॅट फोडले

Gold Price Today | महाग झाले सोने, चांदी झाली स्वस्त; जाणून घ्या आजचा नवीन दर