Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | विनापरवाना व बेकायदेशीर पिस्टल (Pistol) बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक 1 (Anti Extortion Cell, Pune) च्या पथकाने अटक (Arrest) केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्टल आणि एक जिवंत काडतुसे (Cartridge) जप्त केली आहेत. खंडणी विरोधी पथक 1 च्या पोलिसांनी ही कारवाई (Pune Crime) डेक्कन (Deccan) येथील नदीपात्रातील (Mula Mutha River) पांचाळेश्वर मंदिरासमोर मंगळवारी (दि.5) केली. (Pune Criminals)

 

अजय शंकर सुतार Ajay Shankar Sutar (वय- 19 रा. जाधव अपार्टमेंट फ्लॅट नंबर- 9, दत्त मंदिराशेजारी, गोसावी वस्ती, वडगाव बुद्रुक-Wadgaon Budruk, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात (Deccan Gymkhana Police Station) आर्म अ‍ॅक्ट (Arm Act) कलम-3 (25) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस नाईक नितीन रावळ (Police Naik Nitin Rawal) यांना माहिती मिळाली की, पांचाळेश्वर मंदिरासमोर (Panchaleshwar Temple) नदीपात्र डेक्कन पुणे येथे अजय सुतार हा देशी बनावटीचे एक गावठी पिस्टल जवळ बाळगून फिरत आहे. मिळालेल्या माहितीची खात्री करून सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस सापडले. अटक करण्यात आलेला आरोपी अजय सुतार हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) दोन तर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) एक आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale), पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक- 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने (Senior Police Inspector Arvind Mane),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), पोलीस अमलदार नितीन कांबळे,
राजेंद्र लांडगे, विवेक जाधव, प्रफुल्ल चव्हाण, नितीन रावळ, यांनी केलेली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Pune Police Crime Branch arrests criminal who carry unlicensed pistol

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

University Campus Colleges Starting Offline In Maharashtra | राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार – मंत्री उदय सामंत यांची माहिती

 

Anti Corruption Bureau (ACB) Pune | 2 लाखाची लाच मागणारे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यकारी अभियंता प्रमोद तुपे आणि उप अभियंता अरविंद फडतरे ‘गोत्यात’, एसीबीकडून गुन्हा दाखल

 

Congress MLA Praniti Shinde | प्रणिती शिंदेंची राज ठाकरेंवर टीका; म्हणाल्या – ‘लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे…